Sindhudurg Rain : सह्याद्री पट्ट्यात मुसळधार; धबधब्याखाली अडकलेल्या 24 पर्यटकांची पोलिसांनी 'अशी' केली सुटका

सह्याद्री पट्ट्यात कोसळणाऱ्‍या मुसळधार पावसाचा फटका गोव्यातील पर्यटकांना (Goa Tourist) बसला.
Sawantwadi Goa tourist Banda Police
Sawantwadi Goa tourist Banda Policeesakal
Updated on
Summary

नदी तसेच ओहोळांनी रौद्ररूप धारण केल्याने अनेक छोटे पूल, रस्ते पाण्याखाली गेले होते. धबधब्याच्या पाण्याचा वेग देखील प्रचंड वाढल्याने येथे २४ पर्यटक धबधब्याखाली अडकून पडले.

बांदा : सह्याद्री पट्ट्यात कोसळणाऱ्‍या मुसळधार पावसाचा फटका गोव्यातील पर्यटकांना (Goa Tourist) बसला. सावंतवाडी तालुक्यातील दुर्गम घारपी येथे म्हापसा-गोवा येथून पर्यटनासाठी गेलेल्या २४ हून अधिक पर्यटकांचा ग्रुप धबधब्याखाली अडकला होता.

बांदा पोलिसांनी सतर्कता दाखवित अडकलेल्या सर्व पर्यटकांची रात्री उशिरा रेस्क्यू करत सुखरूप सुटका केली. पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला असून, सुदैवाने सर्व पर्यटक सुखरूप बचावले आहेत. म्हापसा-गोवा येथून २४ पर्यटकांचा ग्रुप वर्षा पर्यटनासाठी सकाळीच घारपी येथे गेला होता.

Sawantwadi Goa tourist Banda Police
महाराष्ट्राचे मिनी काश्मीर महाबळेश्वरमध्‍ये सर्वाधिक 104 मिलिमीटर पाऊस; कोयनेतून 1 हजार 50 क्‍युसेक पाण्‍याचा विसर्ग

दिवसभर मुसळधार पाऊस कोसळल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. या परिसरातील नदी तसेच ओहोळांनी रौद्ररूप धारण केल्याने अनेक छोटे पूल, रस्ते पाण्याखाली गेले होते. धबधब्याच्या पाण्याचा वेग देखील प्रचंड वाढल्याने येथे २४ पर्यटक धबधब्याखाली अडकून पडले. पोलिस हेल्पलाईन क्रमांक ११२ वर सायंकाळी उशिरा कॉल करत मदत मागण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच बांदा पोलिस (Banda Police) ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्यामराव काळे यांनी तत्काळ सूत्र हलवली. पोलिस उपनिरीक्षक समीर भोसले फौजफाट्यासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक समीर भोसले व ठाण्यातील ८ अंमलदार यांच्यासह आपत्ती व्यवस्थापनाचे साहित्य घेऊन तातडीने घटनास्थळी गेले.

Sawantwadi Goa tourist Banda Police
Balinga Bridge : महापुराचा धोका! कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील 'या' महत्वाच्या पुलावरून आजपासून वाहतूक पूर्णपणे बंद

घारपी ते असनिये रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने म्हापसा गोवा येथून पर्यटनासाठी आलेले २४ लोक त्यांच्या वाहनासह अडकलेले होते. त्यांना त्या ठिकाणावरून रेस्क्यू करत सुरक्षितरीत्या काढून त्यांच्या घरी सुखरूप रवाना केले. बांदा पोलिसांनी दाखवलेल्या या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

घारपी येथे पर्यटक अडकल्याची माहिती सामाजिक बांधिलकी जोपासणारे रवी जाधव यांनी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना दिली. तहसीलदार पाटील यांनी तत्काळ आपल्या टीम आणि आपत्ती साहित्यासह पोलिसांच्या आपत्कालीन टीमसह घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तत्पूर्वीच बांदा पोलिसांनी पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले होते. गोव्यातील पर्यटकांनी बांदा पोलिसांच्या टीमचे आभार व्यक्त करत दाखविलेल्या तत्परतेचे कौतुक केले.

Sawantwadi Goa tourist Banda Police
पर्यटकांसाठी महत्वाची बातमी! इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर प्रशासन सतर्क; सवतसडा धबधबा, अडरे धरणावर घातली बंदी

मुसळधार पाऊस कोसळत असल्याने रविवारी (ता. २३) बांदा परिसरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे आम्ही दुपारपासूनच अलर्ट होतो. ठिकठिकाणी कर्मचारी तैनात केले होते. सायंकाळी उशिरा पोलिस हेल्पलाईनवर घारपी येथून मदतीसाठी संपर्क केला. तत्काळ पोलिस कर्मचारी बोलावून व जवळ असेल ते आपत्तीचे साहित्य घेऊन आम्ही घटनास्थळ गाठले. त्याठिकाणी माहिती घेत सर्व पर्यटकांना पाण्यातून सुरक्षितरीत्या बाहेर काढले. याकामी आम्हाला स्थानिकांनी देखील मदत केली.

- शामराव काळे, बांदा पोलिस निरीक्षक

अशी राबवली मोहीम

घारपी येथे असलेला धबधबा हा विस्तीर्ण आहे. याठिकाणी पाऊस जास्त पडल्यास धबधब्याला लगेच पाणी येते. येथून समोरच छोटे पूल आहेत. या पुलावरूनदेखील पाणी वाहते. काल असाच प्रकार घडला. पूल पार करून पर्यटक धबधब्याकडे होते. याचवेळी पावसाचा जोर वाढल्याने पुलावर पाणी आले. त्यामुळे पर्यटक अडकले.

Sawantwadi Goa tourist Banda Police
Chiplun Flood : इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडवर; 36 वाड्यांना स्थलांतराच्या नोटिसा, 18 पथकं तैनात

यात महिला व मुलांचा देखील समावेश होता. पोलिस नियंत्रण कक्षाला उशिरा माहिती मिळाल्यानंतर पोलिस तासाभरात घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती गंभीर असल्याने पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांची मदत घेतली. स्थानिक युवक माहितीगार असल्याने त्यांच्या मदतीने दोरी बांधून सर्व पर्यटकांना सुरक्षितरीत्या पुलाच्या अलीकडे आणण्यात आले. यावेळी सर्व पर्यटकांना सुखरूप गोव्यात सोडण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.