ओरोस (सिंधुदुर्ग) : जिल्ह्यात २ जुलै ते ८ जुलै या आठवड्यातील कोविडबाधित रुग्णांचा सरासरी आरटीपीसीआर पॉझिटिव्हिटी रेट १०.७ टक्के होता तर ९ जुलै ते १५ जुलै या गत आठवड्यातील सरासरी पॉझिटिव्हिटी रेट ७.४२ टक्के इतका आहे. दोन्ही आठवड्यांच्या पॉझिटिव्हिटी रेटचे अवलोकन करता सरासरी पॉझिटिव्हिटी रेट ९.०६ झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाने जिल्ह्याचा कोरोना प्रतिबंधासाठी जाहीर केलेल्या पाचपैकी तिसऱ्या स्तरामध्ये समावेश केला आहे. (sindhudurg-positivity-rate-increased-included-covid-19-third-level-konkan-news-akb84)
राज्यातील अन्य जिल्ह्यांत कोरोनाबाधित व मृत्यू संख्या नियंत्रणात येत असताना सिंधुदुर्गात मात्र ही संख्या नियंत्रणात येताना दिसत नाही. मे, जूनच्या तुलनेत जिल्ह्यातील नवीन बाधित व मृत्यू संख्या कमी झाली असली तरी बाधित दर अद्याप कमी झालेला नाही. राज्य शासनाने गेल्या आठवड्याच्या बाधित संख्येवर राज्याची जिल्हानिहाय आकडेवारी १६ जुलै रोजी जाहीर केली आहे. यात सिंधुदुर्गची बाधित संख्या ९.६ टक्के राहिली. त्यामुळे जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या स्तरात झाला आहे.
जिल्ह्यात आरटीपीसीआर, ॲन्टिजेन अशा दोन प्रकारे कोरोना टेस्ट केली जाते. एप्रिल, मे व जूनमध्ये सर्वाधिक भर ॲन्टिजेन टेस्टवर होता. दिवसाला सहा ते सात हजार टेस्ट केल्या जात होत्या. ६०० ते ७०० बाधित मिळत होते. आता ही संख्या चार हजारांच्या आसपास राहिली आहे. दिवसाकाठी २५० ते ३०० बाधित मिळत आहेत. मात्र, शासनाने केवळ आरटीपीसीआर टेस्ट टक्केवारीसाठी गृहीत धरण्याचे आदेश दिले आहेत. आरटीपीसीआर टेस्टची बाधित टक्केवारी जास्त असल्याने जिल्ह्याचा कोरोना बाधित दर जास्त राहिला आहे.
शासनाने ९ ते १५ जुलै या कालावधीत असलेल्या बाधित दराची आकडेवारी १६ जुलै रोजी जाहीर केली आहे. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याची बाधित टक्केवारी ९.६ टक्के राहिली आहे. वास्तविक या आठवड्यात ७.४२ टक्के बाधित संख्या होती; परंतु त्यापूर्वी २ ते ८ जुलै या कालावधीत बाधित दर १०.७ टक्के राहिला असल्याने जिल्ह्याची टक्केवारी सरासरी ९.६ टक्के झाली आहे.
गेल्या आठवड्यातील बाधित टक्केवारी
*तारीख *चाचण्या *बाधित
*९ *४१७२ *२५४
*१० *४५४१ *२७८
*११ *२९३७ *२०९
*१२ *४२७२ *२५२
*१३ *४०३५ *१५९
*१४ *३४८६ *२३०
*१५ *४१२९ *२५०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.