Sindhudurg Flood : सिंधुदुर्गात वरुणराजाची जोरदार मुसंडी, कणकवलीला महापुराचा धोका; आंबोली, करुळ घाटात कोसळल्या दरडी

तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडली असून गड, तिलारी नद्या इशारा पातळी ओलांडण्याच्या स्थितीत आहेत.
Terekhol River
Terekhol Riveresakal
Updated on
Summary

सध्या खारेपाटण शहरात जाणारा मुख्य मार्गाच्या दोन्ही बाजू्ला पाणी आहे; मात्र रस्ता खुला असल्याने वाहतुकीवर परिणाम नाही.

कणकवली : एक दिवसाच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले. आंबोली, करुळ घाटात दरड कोसळण्याचे प्रकार सुरू झाले. कणकवली तालुक्यात जोर अधिक असून, पूरस्थिती निर्माण झाली.

Terekhol River
Chiplun Rain : इर्शाळवाडीत दरड कोसळली अन् हादरली कोळकेवाडी; डोंगराला पडल्या भेगा, कुटुंबं संकटात

तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडली असून गड, तिलारी नद्या इशारा पातळी ओलांडण्याच्या स्थितीत होत्या. पावसाने पाच-सहा दिवस झोडपून काढल्यानंतर शुक्रवारी विश्रांती घेतली होती. दुपारपर्यंत रिमझिम, तर त्यानंतर हलक्या सरी झाल्या; परंतु मध्यरात्री दोननंतर सर्वत्र मुसळधारेला सुरुवात झाली.

रात्रभर सरीवर सरी कोसळत असल्यामुळे नद्यांच्या पातळीत वाढ झाली. सकाळपासून अनेक रस्ते पाण्याखाली गेले. तालुक्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे कणकवलीत पूरस्थिती निर्माण झाली. तालुक्यातील कणकवली- आचरा मार्गावर वरवडे भागात ठिकठिकाणी पाणी असल्याने वाहतूक सकाळपासूनच बंद झाली.

Terekhol River
पावसाचा जोर वाढला! कर्नाटकच्या आलमट्टीत 44 टीएमसी तर महाराष्ट्राच्या कोयना धरणात किती साठा?

भिरवंडे खडशीवाडी, नाटळ, दिगवळे, फोंडाघाट भागातीलही रस्ते बंद आहेत. मुसळधारेचा बीएसएनएल मोबाईल सेवेलाही फटका बसला असून तळेरे, खारेपाटण, कणकवली भागातील सेवा विस्कळीत होती. खारेपाटणच्या सखल भागात पाणी येण्यास सुरवात झाली. त्यामुळे खारेपाटण बाजारपेठ परिसरात भरणारा आठवडा बाजार आज लवकर आटोपता घ्यावा लागला.

सध्या खारेपाटण शहरात जाणारा मुख्य मार्गाच्या दोन्ही बाजू्ला पाणी आहे; मात्र रस्ता खुला असल्याने वाहतुकीवर परिणाम नाही. कणकवली ते वागदे या दरम्यान असलेल्या मराठा मंडळ येथील केटी बंधाऱ्‍यावरून पाणी वाहत असल्याने येथील वाहतूक बंद ठेवली आहे.

Terekhol River
Amboli Ghat : आंबोली घाटातून प्रवास करताय? मग, ही बातमी आधी वाचा; मार्गात येतोय अडथळा

बांदा परिसरातही मुसळधार पाऊस झाला. बांदा-दाणोली मार्ग पाण्याखाली गेला. शुक्रवारी रात्री आंबोली घाटात दरड कोसळली. करूळ घाटात पहाटे दरड कोसळली. दोनही घाटातील दरड हटवून मार्ग वाहतुकीस खुले केले. तेरेखोल नदी इशारा पातळीवरून वाहत आहे. गड, जानवली, तिलारी, वाघोटन नद्यादेखील इशारा पातळीजवळ आहेत.

Terekhol River
Chiplun Flood : आता महापुराची माहिती मिळणार एका 'क्लिक'वर; Mobile वर येणार सतर्क राहण्याचा संदेश

तिलारी धरणातून हलका विसर्ग

तिलारी आंतरराज्य प्रकल्पात धुवॉंधार पाऊस आहे. धरण (Tilari Dam) ७७ टक्के भरले असून, आज सकाळी दहापासून ८.५ क्युसेक विसर्ग सुरू केला आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी येथील स्थितीचा आढावा घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.