Kokan : जिल्ह्यात भविष्यात मोठे उद्योग आणणार ; केंद्रीय मंत्री राणे
कुडाळ : तुम्ही सुरू केलेला व्यवसाय आता जरी छोटा असला तरी तो मोठा करण्यासाठी प्रयत्न करा. सरकार तुमच्या सोबत आहे. कधी तुम्हाला समस्या निर्माण झाल्या तर आम्हाला कळवा, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगून पुढील काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
कुडाळ भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत ‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पनेतून महिला बचत गटांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळावी, म्हणून कुडाळ मराठा समाज हॉल येथे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या निमित्ताने महिला बचत गटांच्या उत्पादन स्टॉल ठेवले आहेत. याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री राणे यांच्या हस्ते झाले.
यावेळी नीलम राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष रणजीत देसाई, अशोक सावंत, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. संध्या तेरसे, समन्वयक बाळू देसाई, जिल्हा बँक संचालक बाबा परब, निमंत्रित राजू राऊळ, कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष आरती पाटील, ओबीसी महिला जिल्हाध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, शहर अध्यक्ष राकेश कांदे, नगरसेवक विलास कुडाळकर, निलेश परब, राजीव कुडाळकर, प्राजक्ता बांदेकर, माजी सभापती विवेक मांडकुलकर, संजय वेंगुर्लेकर, बंड्या सावंत, माजी नगरसेविका साक्षी सावंत, प्रज्ञा राणे, निलेश तेंडुलकर, अजय आकेरकर, साधना माडये, रेवती राणे आदी उपस्थित होते. श्री. राणे यांनी महिला बचत गटांच्या उत्पादित वस्तूंच्या स्टॉलला भेटी दिल्या.
...तर खचू नका!
राणे म्हणाले की, ‘‘व्यवसायासाठी तुम्हाला लागणारी शासकीय मदत निश्चित मिळवून दिली जाईल. आता हा व्यवसाय छोटा असला तरी मोठा व्यवसाय करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावे. पुढील काळामध्ये जिल्ह्यात टेक्स्टाईल, पॅकिंग मशीन अशा प्रकारचे विविध व्यवसायासहित तांत्रिक प्रशिक्षण देणारा प्रकल्प होणार आहे. यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून विविध व्यवसाय केले आहेत. त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला दरही आहे. पण, चांगले पॅकिंग सुद्धा होणे गरजेचे आहे. एखाद्या वेळी व्यवसायात तोटा झाला म्हणून खचू नका तर व्यवसाय सुरू ठेवून तो व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.