Sindhudurg : वेंगुर्लेमध्ये शाळा भरली व्हरांड्यात

मे मध्ये झालेल्या तौक्ते चक्रीवादळात वेंगुर्ले शहरातील शाळा क्रमांक २ या इमारतीवर वडाचे झाड पडून नुकसान झाले होते
sindhudurg vengurle student verandah teaching
sindhudurg vengurle student verandah teachingsakal media
Updated on

वेंगुर्ले : मे मध्ये झालेल्या तौक्ते चक्रीवादळात वेंगुर्ले शहरातील शाळा क्रमांक २ या इमारतीवर वडाचे झाड पडून नुकसान झाले होते. हे झाड काढण्याबाबत वारंवार लेखी पत्राद्वारे कळवून सुद्धा संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष दिलेले नाही; मात्र मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालकांनी आज व्हरांड्यात शाळा सुरू केली आहे. याचीही दखल न घेतल्यास यापुढे शाळा पंचायत समिती कार्यालयात भरविण्यात येईल, असा इशारा पालकांनी दिला आहे.

sindhudurg vengurle student verandah teaching
नवाब मलिकांवर कायदेशीर कारवाई करणार: समीर वानखेडे

शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पालकांनी ४ ऑक्टोबरला गटविकास अधिकारी उमा घारगे-पाटील यांची भेट घेऊन त्यांना ते धोकादायक झाड तोडून शाळा सुस्थितीत करण्याबाबत निवेदन सादर होते. पालकमंत्री उदय सामंत यांनीही वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयाला हे झाड तोडण्याबाबत सूचना केल्या होत्या; मात्र वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयाच्या आवारातील या पडलेल्या झाडाच्या वारंवार फांद्या तोडून धोकादायक मूळ झाड इमारतीवर तसेच आडवे आहे. अशा वेंगुर्ले शाळा क्रमांक २ च्या धोकादायक इमारतीमध्ये मुलांना शिकण्यासाठी न पाठवण्याचा निर्णय पालकांनी घेतला होता; परंतु शाळेत न पाठविल्यास मुलांचे शैक्षणिक नुकसान होईल म्हणून आजपासून पालकांनी शाळा व्हरांड्यात सुरू केली आहे. याबाबत येत्या ८ दिवसात सकारात्मक निर्णय न घेतल्यास पालकांनी ही शाळा पंचायत समिती कार्यालयात भरविण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

sindhudurg vengurle student verandah teaching
नवले पुलावर विचित्र अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चार जखमी

यावेळी शिक्षक पालक संघ अध्यक्ष संजय पिळणकर, उपाध्यक्ष अश्वेता माडकर, नगरसेवक श्रेया मयेकर, धर्मराज कांबळी, साक्षी प्रभू खानोलकर, मसुरकर, निलेश पाटील, महेश गावकर, कैवल्य पवार, राजन गावडे, शरद मेस्त्री, महेंद्र मातोंडकर, प्रशांत आजगावकर, मुख्याध्यापक जाधव, कर्पूगौर जाधव, निना गार्गी, राजश्री भांबर, यांच्यासाहित अन्य पालक यावेळी उपस्थित होते. शाळेच्या इमारतीचा एक भाग धोकादायक आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावा, अशी मागणीही पालकांकडून होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()