सिंधुदूर्गात पावसाची संततधार कायम

भात कापणीला ब्रेक; विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस.
सिंधुदूर्गात पावसाची संततधार कायम
सिंधुदूर्गात पावसाची संततधार कायमsakal
Updated on

वैभववाडी : जिल्हयात आज सायकांळी उशिरा पुन्हा विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस झाला. काही भागाला पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे भातपिक कापणीला ब्रेक लागला असून काही भागात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.जिल्हयाच्या बहुतांशी भागात काल (ता.३) रात्री उशिरापर्यत विजांच्या कडकडाटांसह पाऊस झाला होता.

त्यानंतर आज सकाळपासून देखील जिल्हयात ढगाळ वातावरण होते. दरम्यान सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जिल्हयात विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाला सुरूवात झाली. वैभववाडी, कणकवली, सावंतवाडी, कुडाळ या तालुक्यांना पावसाने अक्षरक्षः झोडपून काढले. काही भागात तर विजांचा लखलखाटाने परिसर दणाणुन गेला. अनेक भागातील विज पुरवठा देखील खंडीत झाल्यामुळे दिवाळीच्या सणावर विरजण पडले.

सिंधुदूर्गात पावसाची संततधार कायम
अमेरिकेत पहिल्यांदाच घडलं असं! हडसन नदी, WTCनं अनुभवली दिवाळी

पावसामुळे जिल्हयातील भातकापणीला ब्रेक लागला आहे. भातपिक कापणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांचे पिक काल झालेल्या पावसात भिजले होते. पुन्हा आज देखील काही भागात कापणी केलेल्या भातपिकांचे नुकसान झाले. जिल्हयात ८० टक्के भातकापणी झाली आहे. अजुनही २० टक्के भातकापणी शिल्लक आहे. ही भातकापणी होण्यासाठी अजुनही आठ ते दहा दिवस लागण्याची शक्यता आहे; परंतु सध्या पडत असलेल्या पावसामुळे या भातपिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक भागात परिपक्व झालेले भाताची लोंबी गळून पडण्याची स्थिती आहे. त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.