मंत्रालयाच्या राष्ट्रीय बोर्डवर कोकणकन्येची निवड

small business national policy elected by a kokan women from pune in ministrysmall business national policy elected by a kokan women from pune in ministry
small business national policy elected by a kokan women from pune in ministrysmall business national policy elected by a kokan women from pune in ministry
Updated on

रत्नागिरी : लघु उद्योगांसाठीचे राष्ट्रीय धोरण ठरवणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय बोर्डावर, मूळ कोकणातील महिलेची निवड झाली आहे. पुणे येथील सुप्रसिद्ध उद्योजिका स्मिता घैसास या चिपळूणच्या कन्येची निवड झाल्याने महाराष्ट्रातील व विशेषत: कोकणातील उद्योजकांना आपले प्रश्न व अडचणी केंद्र सरकारपर्यंत पोहोचवणे सहज शक्‍य होणार आहे.  

सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग (एमएसएमव्ही) मंत्रालयाच्या राष्ट्रीय बोर्डवर पुणे येथील सुप्रसिद्ध उद्योजिका, स्मिता घैसास यांची अभिनंदनीय निवड करण्यात आली आहे.  विशेष बाब म्हणजे सौ. घैसास या पूर्वाश्रमीच्या प्रभा अंतरकर. चिपळूण तालुक्‍याच्या माहेरवाशीण असून येथील डीबीजे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहेत. घैसास पुणे येथील ‘मिनिलेक ग्रुप ऑफ इंडस्ट्री’च्या संचालिका आहेत.

आपल्या उद्योगसमूहाचा कारभार यशस्वीपणे चालवत असतानाच सुयश चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यामार्फत मोहनराव घैसास व स्मिता घैसास हे भारतातील आदिवासी क्षेत्रातील वनवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी आपले तन-मन-धन झोकून कार्यरत आहेत. पुणे येथील अनेक सामाजिक संस्थांशी निगडित असलेल्या स्मिता घैसास या पुणे येथील अत्यंत प्रतिष्ठित व नावाजलेल्या कर्वे स्त्री शिक्षणसंस्था, हिंगणेच्या अध्यक्षपदाची जबाबदारीदेखील सांभाळत आहेत.

कोकणातील उद्योजकांचे प्रश्‍न लागणार मार्गी

लघु उद्योगांसाठीचे राष्ट्रीय धोरण ठरवणाऱ्या या अत्यंत महत्वाच्या राष्ट्रीय बोर्डावर कोकणातील महिलेची निवड झाली आहे. घैसास या चिपळूणची सुकन्या असल्याने कोकणातील उद्योजकांना आपले प्रश्न व अडचणी केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी भक्कम आधार मिळाला आहे. त्यांचे प्रश्‍न केंद्रापर्यंत नेणे सहज शक्‍य होणार आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.