छोट्या मच्छीमारांना बसतोय वाऱ्याचा फटका ; माल कमी असल्याने दर वधारला

small fisherman face problem in fishing due to change in atmosphere in ratnagiri
small fisherman face problem in fishing due to change in atmosphere in ratnagiri
Updated on

रत्नागिरी : गेले काही दिवस सुरू असलेल्या वाऱ्याचा फटका छोट्या मच्छीमारांना बसला आहे; मात्र खोल समुद्रात जाणाऱ्यांना बांगडा, शिंगाडा यासारखी मासळी मिळू लागली आहे. सुरवातीपासून यंदाही बांगड्याचे प्रमाण कमी आहे. माल कमी असल्यामुळे दर वधारला आहे. त्याचा फायदा मासळी मिळणाऱ्या नौकाधारकांना होत आहे.

ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत निसर्गाच्या बदलत्या परिस्थितीला तोंड देत मच्छीमारी व्यावसाय सुरू आहे. नवीन वर्षात पदापर्ण झाले असले तरीही गिलनेटने मासेमारी करणाऱ्यांना म्हणावा तसा फायदा झालेला नाही. गेल्या आठ दिवसांमध्ये थांबून थांबून वारा वाहत असल्यामुळे छोट्या मच्छीमारांना बंदरातच राहावे लागत आहे. वेगवान वाऱ्यामुळे छोट्या होडीवाल्यांना समुद्रात जाऊन मोसमारी करता येत नाही. दुर्घटना घडण्याची भीतीही असते. शनिवारी (२) सायंकाळी अचानक वारा सुटला. रविवारीही तीच परिस्थिती आहे. दर दोन ते तीन दिवसांनी ही परिस्थिती निर्माण होते. 

किनाऱ्यावर शेवाळाचा थर

रापणीवाल्यांची अवस्था बिकट असून त्यांना काहीच मिळत नाही. रत्नागिरीत पाच ठिकाणी रापणीने किनाऱ्यावर मासेमारी केली जाते. पौर्णिमेनंतर दरवर्षीप्रमाणे किनारी भागात शेवाळ येऊ लागली आहे. ती जाळ्यात अडकल्यामुळे साफसफाईचा भुर्दंड मच्छीमारांना बसतो. ही शेवाळ फेब्रुवारीपर्यंत किनारी भागात राहते. वारे सुटल्यानंतर बदलत्या प्रवाहाबरोबर ती किनाऱ्यांवर येत असल्याचा अंदाज मच्छीमारांनी व्यक्‍त केला आहे.

काही प्रमाणात शिंगाडा

जे मच्छीमार समुद्रात जातात, त्यांना बांगड्याचा आधार आहे. खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्यांना बऱ्यापैकी बांगडा मासा मिळत आहे. सरासरी २० डिश (३२ किलो) मासे मिळत आहे. एका डिशला तीन ते साडेतीन हजार रुपये दर मिळतो. मासळी कमी असल्याने दर चांगला मिळत असल्याचे मच्छीमारांनी सांगितले. काही प्रमाणात शिंगाडा मासा मिळत असल्याने त्याला १०० ते १२५ रुपये किलो दर आहे.

एक नजर..

  • थंडीमुळे जेलीफिश आणि डॉल्फिनचा वावर
  • काळबादेवी, आरे-वारे, गणपतीपुळे        परिसरात फिरताहेत
  • मच्छीमारांना सहन करावा लागतोय त्रास

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.