Raigad News : इंस्टाग्रामवरील ओळख पडली महागात; वृध्द इसम निम्स बादल यांची हत्या करून त्याची गाडी व दागिने घेवुन फरार

गोवा पोरवोरीम येथे वृद्ध इसमाची हत्या करून गाडी व दागिने घेऊन पळणाऱ्या आरोपींना परळी येथे अटक
social media instagram fraud crime older person killed and stolen gold car
social media instagram fraud crime older person killed and stolen gold carSakal
Updated on

Pali News : गोवा राज्यातील पोरवोरीम येथे 77 वर्षीय वृध्द इसम निम्स बादल यांची हत्या करून त्याची गाडी व दागिने घेवुन फरार झालेल्या बावीस वर्षीय महिलेसहित इतर एक असे दोन आरोपींना वाशी, नवी मुंबई येथील गुन्हे शाखा, कक्ष-१चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या पथकाने आणि पाली पोलिस स्टेशन च्या पथकाने रविवारी (ता.4) पाली खोपोली राज्य महामार्गावर परळी जवळ अटक केली आहे.

या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, उत्तर गोवा येथील पोरवोरीम येथील निम्स बादल यांची आरोपी महिला (वय २२वर्षे) हीच्या सोबत इन्स्टाग्राम या सोशल मीडियामार्फत ओळख झाली होती. या ओळखीमुळे निम्स बादल यांनी तिला गोवा फिरण्यासाठी आमंत्रण केले होते.

आरोपी महिला आणि तिचा सहकारी आणि त्यांचा मित्र कुणाल (रा. भोपाळ, मध्यप्रदेश ) असे तिघे जण उत्तर गोवा येथील निम्स बादल यांच्याकडे शनिवारी (ता.3) गेले होते. तेथून त्यांना आण्यासाठी निम्स बादल यांनी गाडीची व्यवस्था केली होती.

या सर्वांची राहण्याची व्यवस्था निम्स बादल यांनी त्यांच्या राहत्या व्हीला (बंगल्यात) केली होती. सदर व्हिलामध्ये असताना रात्रीच्या सुमारास निम्स बादल यांनी या महिले सोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला.

त्यांच्याशी झालेल्या वादातून आरोपी महिला व तिच्या सोबत असलेल्या दोन इसमांनी निम्स बादल यांचा खून केला. व त्यांची फॉर्च्युनर कार, अंगावरील दागिने व मोबाईल फोन असा एकूण ४७,८२,०००/- रूपये किमतीचा मुददेमाल घेवुन फरार होत महाराष्ट्रात आले होते. सदर आरोपी रायगड जिल्ह्यात आले असल्याची माहिती वाशी,

नवी मुंबई येथील गुन्हे शाखा, कक्ष-१चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस उप निरीक्षक सचिन बाराते, पोलिस हवालदार बालाजी चव्हाण, पोलिस हवालदार सुमंत बांगर, पोलिस हवालदार विश्वास भोईर यांचे पथक तयार केले तसेच पाली पोलिस स्टेशनच्या मदतीने परळी येथे एक पुरुष (वय ३२ वर्षे.व्यवसाय स्टॉक मार्केट ट्रेडींग, रा. अमन कॉलनी, संगम टेन्ट हाउस जवळ, ता. हुजूर जि. भोपाळ, मध्यप्रदेश)

व एक महिला ( वय २२ वर्षे धंदा- नोकरी रा. नवीन कॉलनी, संगम टेन्ट हाउस जवळ, ता. हुजूर जि. भोपाळ, मध्यप्रदेश) यांना ताब्यात घेतले. व त्यांच्याकडून बादल यांची फॉरच्युनर कार, अंगावरील दागिने व मोबाईल फोन असा एकूण ४७,८२,०००/-रू किमंतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.