ST Bus Stuck: कोकणात गावी जाणाऱ्या नागरिकांना मनस्ताप! CNG नसल्यानं बस वीस तासांपासून पंपावरच

अन्न-पाण्यावाचून प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.
Kokan News
Kokan News
Updated on

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात गावाकडं निघालेल्या नागरिकांना एसटीच्या भोंगळ कारभारामुळं मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागलं आहे. मुंबईतील भांडूप आणि अन्य ठिकाणांहून काल रात्री ९ वाजता सुटलेल्या एसटीच्या बसेस अजूनही महाडमध्येच आहेत. इथल्या पंपावर सीएनजी संपल्यानं तब्बल वीस तास उलटून गेले तरी या बस इथं अडकून पडल्याचं साम टीव्हीच्या सुत्रांनी सांगितलं आहे.

Kokan News
Farmer's Death Fund: जीवन संपवलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांचा निधी मिळणारच! सरकारनं बदलला जीआर

सामच्या वृत्तानुसार, रात्री नऊ वाजता भांडुप आणि अन्य ठिकाणाहून सुटलेल्या गाड्या अजूनही महाडमध्येच आहेत. महाड येथील सीएनजी पंपावर सीएनजी संपला असल्यानं या बस गाड्या सकाळी आठ ते चार वाजेपर्यंत सीएनजी पंपावरच अडकून पडल्या होत्या. यामुळं वैतागलेल्या प्रवाशांनी चांगलाच गोंधळ घातला.

Kokan News
Video: राईड कॅन्सल केली म्हणून प्रवाशी महिलेला रिक्षा चालकाची मारहाण, अर्वाच्च शिवीगाळ

इतका काळ या एकाच ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांना सीएनजी पंपावरील शौचालय देखील वापरायला दिलं नाही. तसंच तब्बल वीस तास उलटून गेल्यामुळं अन्न आणि पाण्यावाचून हे प्रवासी व्याकूळ झाले होते. त्याचबरोबर या मार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडीमुळं देखील हे प्रवाशी वैतागून गेले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.