ST Bus : एसटी वाहन चालकाची स्टंटबाजी! प्रवाशांचा जीव धोक्यात घालून पुलावरून पाणी जात असताना एसटी नेली पुढे

पाली बस स्थानकावरून बुधवारी (ता. 24) सकाळी पावणे अकरा वाजता सुटणारी घोडगाव मार्गे पेणकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस निघाली. मुसळधार पाऊस सुरु होता.
ST Bus in Flood Water
ST Bus in Flood Watersakal
Updated on

पाली - पाली बस स्थानकावरून बुधवारी (ता. 24) सकाळी पावणे अकरा वाजता सुटणारी घोडगाव मार्गे पेणकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस निघाली. मुसळधार पाऊस सुरु होता. अंबा नदीने रुद्ररूप धारण केले होते. भेरव गावाजवळील अंबा नदीपुलावरून पाणी जात होते. अशा धोकादायक परिस्थितीत मागचा पुढचा विचार न करता चालकाने स्वतःचा व प्रवाशांचा जीव धोक्यात घालून पुलावरून वाहत्या पाण्यातून बस नेली.

यासंदर्भात संबंधित चालक व वाहक यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी तर्फे करण्यात आली असून पाली बस स्थानकात असे निवेदन देखील देण्यात आले आहे.

पुलावरून जाणाऱ्या एसटी बसचा हा व्हिडीओ समाज माध्यमांवर देखील व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहणारे तसेच यावेळी उपस्थित प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. चालक व वाहक यांच्या बेदरकार वर्तनाबाबत कारवाई करण्यात यावी असे देखील बोलले जात आहे.

पुलावरून पाणी जात असताना देखील धोकादायकरित्या येथून बस नेतांना मी स्वतः व पुलाच्या दोन्ही बाजूला उपस्थित नागरिकांनी पाहिले आहे. अशाप्रकारे प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणे खूप निंदनीय आहे. त्यामुळे संबंधित चालक व वाहक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यांचे निलंबन न केल्यास वंचित बहुजन आघाडीतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल.

- अमित गायकवाड, युवक अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, रायगड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.