सागरी महामार्गच्या मजबुतीकरणाचे काम सुरू करा अन्यथा उपोषण

52060046_1191662137659400_6.jpg
52060046_1191662137659400_6.jpg
Updated on

बोर्डी : आठ दिवसाच्या आत झाई-डहाणु सागरी महामार्गच्या मजबुतीकरणाचे काम सुरू करा अन्यथा,उपोषणाला बसणार आहे. असा इशारा डहाणु विधानसभा मतदार संघातील सत्तधारी पक्षाचे आमदार पास्कल धनारे यांनी दिला तर, सोबत जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी देखील आमदांना समर्थन केले आहे.

घोलवड-बोर्डी दरम्यान खुटखाडी पुलाच्या नुतनिकरणाच्या भुमीपुजन कार्यक्रमात ग्रामस्थांना संबोधित करताना आपली भूमिका स्षष्ट केली. या रस्त्यासाठी जानेवारी 2018 साली तीन कोटी ऐंशी लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नसल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

या बाबतीन आपली भूमिका स्षष्ट करावी अशी मागणी ग्रामस्थानी केली. या वेळी ते म्हणाले की शासनाचा निधी मंजूर होवूनही ठेकेदार कामं सुरु करण्यात विलंब लावत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरते. त्यांच्या भावनाशी सहमत होवून उपोषणाचा निर्णय घेतला आहे असे म्हणाले.

खुटखाडी पुल जर्जर झाल्याने अप्रिय घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पावसाळ्यापुर्वी पुलाचे काम पूर्ण होईल अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे यांनी दिली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.