नीलिमाच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; स्टेट बँकेच्या व्यवस्थापकाला अटक, महत्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता!

गायकवाड हा नीलिमा नोकरीला लागल्यापासूनच तिच्यावर उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी दबाव आणत होता.
Neelima Chavan Death Case
Neelima Chavan Death Caseesakal
Updated on
Summary

नीलिमाने प्रामाणिक प्रयत्न करून देखील तिला काम जमत नसल्याचे बोलून कामावरून काढून टाकण्याबाबत धमकी दिली होती.

दाभोळ : चिपळूण तालुक्यातील ओमळी येथील नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यू प्रकरणाला (Neelima Chavan Death Case) वेगळे वळण लागले आहे. नीलिमाला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याच्या संशयावरून स्टेट बँकेतील प्रकल्प व्यवस्थापक संग्राम गायकवाड (मूळ गाव कोल्हापूर) याला रत्नागिरी येथून अटक केली आहे.

Neelima Chavan Death Case
Kolhapur Crime : कडबाकुट्टी यंत्रानं घेतला सासू-सुनेचा बळी; विजेच्या धक्क्यानं दोघींचा दुर्दैवी अंत, गावावर शोककळा

त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : दाभोळ खाडीत उसगाव येथे एक ऑगस्टला मृतावस्थेत मिळालेल्या नीलिमाच्या आकस्मिक मृत्यूप्रकरणी दाभोळ सागरी पोलिस तपास करीत आहेत.

तपासात नीलिमाच्या व्हिसेराची सामान्य व विशिष्ट रासायनिक चाचणीअंती कोणत्याही प्रकारचे विष दिसून आले नसल्याचे अहवालात नमूद आहे. बुडाल्यामुळे श्वास बंद होऊन मृत्यू असे नमूद केले आहे. पोलिसांनी चिपळूण, खेड व दापोली येथील एसटी बसस्थानक, रेल्वेस्थानक व इतर ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली आहे.

Neelima Chavan Death Case
Ashok Chavan : 'वसंतदादांची सांगली, काँग्रेसकडेच चांगली'; अशोक चव्हाणांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार?

नीलिमाचे नातेवाईक सुधाकर चव्हाण यांनी चिपळूण पोलिस ठाणे येथे गुरुवारी (ता. १७) तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबाबत स्टेट बँकेतील प्रकल्प व्यवस्थापक संग्राम गायकवाड याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार संशयित गायकवाड याच्याविरोधात गुन्हा दाखल करून तो दाभोळ सागरी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता.

तक्रारीत सुधाकर तुकाराम चव्हाण यांनी नमूद केले आहे की, नीलिमा १५ एप्रिल ते २९ जुलै या काळात दापोली येथील बँकेत काम करीत होती. बॅंकेचा प्रकल्प व्यवस्थापक संग्राम गायकवाड (मूळ रा. कोल्हापूर) याला नीलिमा दैनंदिन कामकाजाचा अहवाल देत असे. नीलिमा सुटीवर असतानाही गायकवाड वारंवार दूरध्वनी करून तिला उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सुचवित होता.

Neelima Chavan Death Case
Shivendraraje Bhosale : छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; शिवेंद्रराजेंनी व्यक्त केला वेगळाच संशय

नीलिमाला दिवसाला ४ ते ५ डी-मॅट खाती उघडण्यासाठी गायकवाड जाणूनबुजून दबाव आणत असल्याचे नीलिमाने मला व तिचा भाऊ अक्षय याला सांगितले होते. गायकवाड हा नीलिमा नोकरीला लागल्यापासूनच तिच्यावर उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी दबाव आणत होता. नीलिमाने प्रामाणिक प्रयत्न करून देखील तिला काम जमत नसल्याचे बोलून कामावरून काढून टाकण्याबाबत धमकी दिली होती.

Neelima Chavan Death Case
Manipur Violence : महिलांवर अत्याचार होत असेल, तर भाजप सरकार तातडीनं कारवाई करतं; चित्रा वाघांचा विरोधकांवर निशाणा

यातूनच ती चिंताग्रस्त झाली होती. ती घरामध्ये व्यवस्थित जेवत नव्हती. चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीअन्वये दाभोळ सागरी पोलिस ठाणे येथे नीलिमाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबाबत संग्राम गायकवाड याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला गुरुवारी (ता. १७) रात्री अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक तुषार पाचपुते तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()