State Drama Competition : ‘लिअरने जगावं की मरावं,’ला प्रेक्षकांची मिळाली दाद

समर्थ रंगभूमीचे सादरीकरण; कलाकारांच्‍या अभिनयाने जिंकली मने
State Drama Competition drama Lear to live or die appreciated by audience
State Drama Competition drama Lear to live or die appreciated by audiencesakal
Updated on

रत्नागिरी : अंहकार... हा कुणालाच असू नये, मग कलावंत असो व अन्य. कलेचा अहंकार कुणी करू नये, असंच म्हटलं जातं. या अहंकारामुळे हौशी मराठी राज्य नाट्यस्पर्धेच्या तिसऱ्या पुष्पात नाट्यक्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शक विप्लव मुजुमदार यांच्या जीवनपटाचा उलगडा करताना स्व. जयंत पवार लिखित लिअरने जगावं की मरावं? या नाट्यसंहितेतून समर्थ रंगभूमी या संस्थेने सादरीकरण केले. उत्तम दिग्दर्शनात नटलेला अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत, रंगभूषा असे चोहोबाजूने रंगतदार झाले. अभिनयाची चुणूक दाखवणाऱ्या या नाटकातील कलाकारांचे रसिकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. येथील बुजूर्ग रंगकर्मींनी शुभेच्छाही दिल्या.

काय आहे नाटक ?

‘लिअरने जगावं की मरावं,’ ही संहिता नाट्यक्षेत्राशी निगडित होती. दिग्गज दिग्दर्शक विप्लव मुजुमदार हे उदयन नाट्य कलाकेंद्रात अभिनयाचे धडे मुलांना देतात. त्यांची ख्याती सर्वतोपरी असते. मुलासारखे प्रेम केलेला असीम हा विद्यार्थी त्यांना सोडून जातो. ही सल त्यांना असते. उदयन या संस्थेतर्फे लिअरने जगावं की मरावं, हे नाटक सादर करण्याचे ठरते. लिअरची भूमिका विप्लव साकारत असतात. पात्रांची निवड केली जाते. कलेची उत्तम जाण असलेली सहकारी अरुंधती काम करत असते. तिच्यासोबत काम करणारी योगीन व्यास हिच्याबरोबर त्याचे खटके उडतात. अरुंधती-विप्लव यांना योगिनीला मध्यवर्ती भूमिका देऊ नका, असे सांगत असते. दोघांमध्ये वाद होतो, तो विकोपाला जातो. अरुंधती नाटक सोडते.

तिच्याशिवाय नाटकाचा प्रयोग प्रेक्षकांना भावतो. नाटक उत्तम झाल्याने आणि लिअरच्या भूमिकेची दाद मिळाल्याने बेभान झालेला विप्लव मद्याच्या नशेत अरुंधतीच्या घरी जातो. दोघांमध्ये पुन्हा वाद होतात. कलेचा अहंकार आणि मद्याच्या नशेत तिच्या अंगावर दारू ओतून पेटवून देतो. अरुंधती मरते. या घटनेतून विप्लवची न्यायालयातून सुटका होते. उदयन संस्थेची समिती त्यांच्याकडून राजीनामा लिहून घेते. अरुंधतीच्या मरणाचा सत्य विप्लवला माहीत असते. ‘जगावं की मरावं’ हा त्यांच्यासमोर प्रश्न उभा रहातो. आठ वर्षांनतंर त्यांची पत्नी प्रभावती न्यायला येते; मात्र विप्लव जात नाही. आत्महत्या करण्यासाठी डोंगर-झाडीत उडी मारण्याचा प्रयत्न करतो. भूमिकेशी समरस झालेल्या विप्लवच्या डोक्यात लिअरच असतो, तो त्याच्यासमोर येतो. विषारी झाडांच्या मुळीपासून रस तयार केला आहे, तो आपण दोघांनी घ्यायचा आणि जिवंत राहिलास तर पुन्हा चांगले जीवन जगायचं, असे सांगतो. या नाटकातून अतिशय सुदंर असा नाट्यप्रयोग रसिकांना पाहायला मिळाला.

पात्र परिचय

किंग लिअर ः संतोष गार्डी, बॅनर्जी ः अजित पाटील, अरुंधती ः ऋचा मुकादम, योगिनी व्यास ः आर्या वंडकर, प्रभावती ः स्मितल चव्हाण, मिहीर ः गिरीश शितप, अंजू ः स्वप्नाली घाणेकर, जतीन ः कौशल मोहिते. मंथन ः बबलू शर्मा. कोठारी ः श्रीकांत पाटील, असीम भानू ः स्वानंद मयेकर, सोमा ः मनीष साळवी, तारकादेवी ः समीक्षा सावंतदेसाई, निर्मल ः सागर मायंगडे, अखिलेश ः किरण राठोड, यामिनी ः अनुजा जोशी.

सूत्रधार आणि साहाय्य

नेपथ्य ः प्रवीण धूमक, प्रकाशयोजना ः राजेश शिंदे, पार्श्वसंगीत ः निखिल भुते, वेशभूषा ः चैताली पाटील, रंगभूषा ः प्रदीप पेडणेकर, सूत्रधार ः कौस्तुभ केळकर, साई प्रसादे, समीर बंडबे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.