हर्णे : राज्यस्तरीय लाठीकाठी स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचं नेतृत्व करताना दापोलीच्या प्रशिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ कामगिरी करून ५९ मेडलची कमाई करून दुसऱ्या क्रमांकाचे जेतेपद मिळवलं. त्यामुळे तालुक्यातून विद्यार्थी व प्रशिक्षकांच कौतुक होत आहे. नुकत्याच ११ व १२ डिसेंबर २०२१ रोजी सिंहगड कॉलेज केगाव सोलापूर येथे लाठी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने घेण्यात आलेल्या दुसऱ्या राज्यस्तरीय लाठीकाठी स्पर्धेत दापोलीतून एकूण २९ स्पर्धक सहभागी झाले होते.
सदर स्पर्धेत राज्यातील एकूण २६ जिल्हयातून ४९७ स्पर्धेक सहभागी झाले होते. या स्पर्धेत एकमलाठी, द्वे लाठी, व काठपवित्रा या प्रकारांमध्ये दापोलीच्या विद्यार्थानी २० सुवर्णपदक, १३ रौप्यपदक व २६ कास्यपदकांची कमाई करत दुसऱ्या क्रमांकाचे जेतेपदक पटकावून राज्यात आपली वेगळीच छाप पाडली आहे. तसेच यावेळी दापोली तालुक्यातील प्रशिक्षक राष्ट्रीय पंच परिक्षेत - सुरेंद्र शिंदे, चिन्मय गुरव व स्नेहा भाटकर उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेमध्ये प्रशिक्षक चिन्मय गुरव ३ सुवर्ण , स्नेहा भाटकर २ सुवर्ण , तर विद्यार्थ्यांमध्ये श्रद्धा लोखंडे २ सुवर्ण, सुहान बैकर २ सुवर्ण, आदिती पिंपळे १ सुवर्ण १ रौप्य, सौम्या आंजर्लेकर १ सुवर्ण १ कांस्य, शर्वरी शिगवण १ सुवर्ण १ कांस्य, गार्गी केळकर १ सुवर्ण १ कांस्य, वैष्णव शिंदे १ सुवर्ण १ कांस्य, भूमी सावंत १ सुवर्ण १ कांस्य, अर्जुन पिंपळे १ सुवर्ण १ कांस्य, ऋषिकेश गुहागरकर १ सुवर्ण १ कांस्य, शंतनू झगडे १ सुवर्ण १ कांस्य, अथर्व पवार १ सुवर्ण १ कांस्य, आर्या पिंपळे १ सुवर्ण १ कांस्य, नाविण्या सोनवाडकर २ रौप्य, मुग्धा सावंत २ रौप्य, रितेश घाडगे २ रौप्य, मंथन यादव २ रौप्य, सलोनी पवार १ रौप्य १ कांस्य, देवयानी देवघरकर १ रोप्य १ कांस्य, भक्ती माळी १ रौप्य १ कांस्य, आकांक्षा औंधकर १ रौप्य १ कांस्य, उत्कर्ष पाटील २ कांस्य, रोशनी पावसे २ कांस्य, अनन्या चव्हाण २ कांस्य, ओम भागवत २ कांस्य, रोहन माने २ कास्य, आयुशी काटकर २ कास्य अशी पदके विद्यार्थ्यांनी मिळवली आहेत. या स्पर्धेत २० विद्यार्थी दापोली शहरातील तर ९ विद्यार्थी हर्णेमधील होते. त्यामुळे वरील सर्व विद्यार्थ्यांचे लाठी असो.ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष उत्तम पाटील यांनी विशेष अभिनंदन करून सत्कार केला . त्याबरोबरच सर्व पालकांचे तसेच प्रशिक्षकांचे देखील भरभरून कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.