जिल्हा रायगड पाली : अंबा कलम बनविणे व माळीकाम करणे हे कौशल्याचे काम आहे. सर्वसामान्य लोकांनाही ते सहज जमणार नाही. मात्र सुधागड तालुक्यातील रा.जि.प. शाळा सिद्धेश्वर येथील लहानगे अगदी सहज शास्त्रशुद्धरित्या आंबा कलम बनवितात. शाळेच्या परसबागेत बागकाम देखील करतात.
विदयार्थ्यांना याबाबत अधिक माहिती देण्यासाठी व प्रात्यक्षिक करण्यासाठी नुकतीच येथे आंबा कलम कार्यशाळा संपन्न झाली. नॅशनल स्किल कॉलिफिकेशन् फ्रेमवर्क (NSQF) अंतर्गत माळी काम व आंबा कलम कार्यशाळा जनार्दन भिलारे पदवीधर शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांचे गट पाडून प्रत्येक गटाला एक गावठी आंबा झाड व कलम पट्टी, कलम काडी, ब्लेड, प्लास्टिक बॅग दिली गेली.
प्रथम गावठी झाडाचा शेंडा कट करून घेतला व नंतर त्यावर कलम काडीला २ इंच v आकार देऊन गावठी आंब्यावर २ इंच छेद दिला. v आकार दिलेली कलम काडी गावठी आंब्यावर घट्ट बसविली व कलम पट्टीच्या साह्याने घट्ट बांधले. तयार झालेल्या आंबा कलमावर वरून लहान प्लॅस्टिक बॅग टाकली व खाली धागा बांधला. अशा प्रकारे प्रत्येक कृती मुलांकडून प्रात्यक्षिक दाखवून करून घेतले.
या उपक्रमातून मुलांना स्वतः आंबा कलम तयार करता आला. त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका रोहिणी खामकर तसेच शिक्षका स्वप्नाली मेमाणे, प्रिया काळे यांनी खूप मेहनत घेतली. या उपक्रमाचे शिक्षणाधिकारी रायगड पुनिता गुरव,व्हिएसटीएफ जिल्हा कार्यकारी रत्नशेखर गजभिये, गटशिक्षणाधिकारी साधुराम बांगारे, केंद्रप्रमुख कैलास म्हात्रे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रविंद्र यादव, उपाध्यक्षा तेजस्विनी गायकवाड व सर्व सदस्य तसेच सर्व स्तरावर कौतुक होत आहे.
पर्यावरण रक्षण काळाची गरज आहे. भावी काळात शेतीला महत्त्व प्राप्त होणार आहे. विद्यार्थ्याना बागकाम व शेतीकाम येणे गरजेचे आहे. यादृष्टीने कलम करण्याचे कौशल्य शिकल्यास ते स्वतः रोपवाटिका तयार करू शकतात. हा पर्यावरण स्नेही उपक्रम विद्यार्थांना खूप आवडला.
मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक मुलांना उस्फूर्तपणे माळी काम हा विषय शिकवतात. त्यामुळे मुलांना पर्यावरणाची आवड निर्माण झाली आहे. शाळेतील काही विद्यार्थी स्वतः कलम करतात. याबाबतचे व्हिडिओ यू ट्यूब वर टाकले आहेत ते पाहून आपणही कलम करू शकता. जनार्दन भिलारे, निसर्गप्रेमी शिक्षक, रजिप शाळा सिद्धेश्वर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.