कष्टाचं झालं चीज! शाळेच्या 11 गुंठं क्षेत्रात विद्यार्थ्यांनी फुलवली परसबाग; सकस आहारामुळं आता आजारी पडण्याचं प्रमाण होणार कमी

शाळा सुरू झाल्‍यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात विविध प्रकारची भाजी लावण्यात आली होती.
Ambrad High School Kankavali
Ambrad High School Kankavaliesakal
Updated on
Summary

मुलांना परसबागेची गोडी लागल्‍याने बागेची देखभाल उत्तम प्रकारे केली जात आहे.

कणकवली : आंब्रड हायस्कूलमधील (Ambrad High School) विद्यार्थ्यांनी (Students) शिक्षकांच्या (Teacher) साहाय्याने तब्‍बल ११ गुंठे क्षेत्रात परसबाग फुलवली आहे. या मुलांना आता रोजच्या आहारात ताज्या भाजीपाल्‍याची चव चाखण्यास मिळत आहे. विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक देखील होत आहे.

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत परसबाग निर्माण करण्याचा उपक्रम प्रभावीपणे शाळास्तरावर राबवण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्‍या होत्या. त्‍यानुसार आंब्रड (ता. कुडाळ) हायस्कूल मधील ११५ विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या माध्यमातून ११ गुंठे क्षेत्रामध्ये परसबाग फुलवली आहे.

Ambrad High School Kankavali
Navratri Festival : काळा कोट, कायद्यावर बोट..! महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना 'या' नवदुर्गा ठोठावताहेत शिक्षा

मुख्याध्यापक राठोड, त्‍यांचे सहकारी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी प्रशालेतील मोकळ्या क्षेत्रामध्ये मातीची योग्‍य मशागत करून भेंडी, चवळी, माठ, मेथी, शेवगा, दोडकी, पडवळ, वांगी यापैकी एका भाजीचे रोज उत्पादन मिळेल, अशा प्रकारे नियोजन केले. या सगळ्या बागकामात मुलांनाही जमिनीची मशागत, तण काढणे, पाऊस नसेल तेव्हा योग्‍य प्रमाणात पाणी देणे आणी कामे शिकविण्यात आली.

शाळा सुरू झाल्‍यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात विविध प्रकारची भाजी लावण्यात आली होती. जुलैच्या मध्यापासून दररोज वेगवेगळ्या प्रकारची भाजी उपलब्‍ध होऊ लागली आहे. मुलांनाही परसबागेची गोडी लागल्‍याने बागेची देखभाल उत्तम प्रकारे केली जात आहे. पुढील नियोजनानुसार प्रत्‍येक आठ ते पंधरा दिवसांनी नवीन भाजी पाला लागवडही केली जात आहे.

Ambrad High School Kankavali
आमदाराच्या पाहणी दौऱ्यावेळीच धमाका; उड्डाणपुलाचे 30 गर्डर खाली कोसळले, भूकंपासारखा आवाज झाल्याने नागरिकांची पळापळ

सध्या आंब्रड शाळेत पडवळ, दोडकी, कारली ही पिके मुबलक प्रमाणात तयार झाली आहेत. भेंडी, वांगी, चवळीचे उत्‍पादन पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे. याखेरीज दिवाळी सणानंतर एप्रिल अखेरपर्यंत भाजीपाला तयार व्हावा, याचंही नियोजन मुलांनी तयार केले आहे.

मुख्याध्यापक श्री. राठोड सांगतात की पूर्वी मध्यान भोजनामध्ये भाजी आली की विद्यार्थी नाक मुरडायचे. पण अाता मुलं स्वत:च भाजीपाला उत्‍पादीत करत अाहेत. त्‍यामुळे आपण पिकविलेला भाजीपाला ते मोठ्या आनंदाने खात आहेत. यंदा शाळेतील कुंपणावर तसेच मोकळ्या जागेत वाल, फूलकोबी, पानकोबी, गाजर,मुळा, बिट, गुलाबी वाल, दोडके, काळे बियाचा वाल, कारले, हिरवी, पांढरी आणि पांढरट हिरवी वांगी लावली आहेत. याखेरीज गावरान टोमॅटो, वाटाणा, मिर्ची, चवळी, बरबटी, गवार, भेंडी, कोथिंबीर, काकडी, शेपू आदींचीही लागवड केली असल्‍याची माहिती श्री.राठोड यांनी दिली.

Ambrad High School Kankavali
Navratri Festival : सौंदत्ती डोंगरावर रेणुका देवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी; 'उदे गं आई उदे'चा जयघोष

मुलांना शाळेत नियमित जेवणाबरोबर मुबलक प्रमाणात भाजीपाला उपलब्‍ध होत असल्‍याने सकस आहार उपलब्‍ध झाला आहे. मूल आजारी पडण्याचंही प्रमाण कमी झाले आहे. सकस आहार मिळाला तर मुलांना अध्ययन करणे सोपे जाते. नियमित अभ्यासाबरोबर परसबागेची गोडी लागल्‍याने मुलांना अध्यापन करणंसही सोपे जात आहे. त्‍याचबरोबर मुलांमध्ये चांगला शेतकरी निर्माण करता आला याचाही आम्‍हाला मोठा आनंद आहे.

-राजेंद्र राठोड, मुख्याध्यापक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.