Success Story: शेतकऱ्याच्या मुलांनी नाव कमावले नाव; मेहनतीच्या जोरावर बहिण भावांनी मिळवली खाकी वर्दी

Raigad: घरची परिस्तिथी अतिशय बिकट असताना दोन्ही बहीण भावाने पोलिस व्हायचं ठरवलं. पण पोलीस भरतीची कसलीच माहिती नव्हती.
Success Story: शेतकऱ्याच्या मुलांनी नाव कमावले नाव;  मेहनतीच्या जोरावर बहिण भावांनी मिळवली खाकी वर्दी
Updated on

Pali Latest News : बिकट परिस्थितीत जिद्द व कठोर मेहनतीच्या जोरावर सख्ये बहिण व भाऊ पोलीस खात्यात भरती झाले आहेत. शेतकरी वडिलांनी त्यांच्या या प्रगतीसाठी देखील मोलाचा वाटा उचलला आहे. हे दोघे बहिण भाऊ रोहा तालुक्यातील बाहेरशिव या छोट्या गावातील आहेत. शेतीची कामे व दूध विकून त्यांनी परिश्रम व अभ्यास करून हे यश संपादन केले आहे. या दोघा बहिण भावांचा हा थक्क करणारा प्रवास सर्वांसाठीच मार्गदर्शक ठरत आहे.

हर्षल कैलास पालांदे, ठाणे पोलीस तर भाग्यश्री कैलास पालांदे रायगड पोलीस मध्ये नुकतेच भरती झाले आहेत. वडील शेतकरी असून त्यांनी आपल्या मुलांना शिकवण्यासाठी खूप मेहनत केली आणि अजून सुद्धा करत आहेत. हर्षल ने सांगितले की ते एकूण 5 भावंडे 4 बहिणी आणि तो एक भाऊ. घरची परिस्तिथी अतिशय बिकट असताना दोन्ही बहीण भावाने पोलिस व्हायचं ठरवलं. पण पोलीस भरतीची कसलीच माहिती नव्हती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.