*२५ वर्षे मुंबईत मराठी रंगभूमीशी निगडित क्षेत्रात रमलेल्या श्रीकांतने आणला इस्रायली आंब्याचा प्रयोग*

success story farming in ratnagiri farming marathi news
success story farming in ratnagiri farming marathi news
Updated on

देवरूख (रत्नागिरी) : शेती या क्षेत्राशी फारसा संबंध नसतानाही ताम्हानेतील युवक श्रीकांत तटकरे याने आपल्या जागेत एक एकर परिसरात चक्‍क इस्रायली पद्धतीने आंबा लागवड करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे यात आंतरपिक म्हणून अननस, भुईमूग, सर्व प्रकारच्या भाज्यांचीही उत्पादने त्याने घेतली आहेत. ही लागवड यशस्वी झाली असून पुढील वर्षापासून त्याचे उत्पादन सुरू होणार आहे. 

आंबा लागवडीचा प्रयोग चक्क इस्रायली पद्धतीने !

जवळपास २५ वर्षे मुंबईत मराठी रंगभूमीशी निगडित क्षेत्रात रमलेल्या श्रीकांत शिवराम तटकरे या युवकाने नाशिकमध्ये हा प्रयोग पाहिला. हा प्रयोग करणारे जनार्दन वाघेरे यांच्याकडून मार्गदर्शन घेत, त्यांच्याकडचीच रोपे घेऊन त्याने हा प्रयोग राबवला. २५ जून २०१९ ला एक एकर जागेत तब्बल ८०० केसर आणि ५० विविध प्रकारच्या आंब्यांची लागवड केली. याशिवाय ४५ वेगवेगळ्या प्रकारचे पेरू, ४५ विविध जातींचे काजू, चिकू, विविध जातींची ३५ नारळ लागवडही करण्यात आली. आंतरपिक म्हणून ३०० अननस लागवड आहे. याशिवाय टोमॅटो, वांगी, मिरची अशा भाज्या आणि बुश पद्धतीने काळीमिरीची लागवड केली आहे.

ताम्हाणेतील श्रीकांत तटकरेंचा पुढाकार; आंतरपिके घेतली

ठिबक सिंचन आणि सेंद्रिय खतावर ही लागवड असून येथे २०१९ पासून ६ जणांना रोजगार मिळाला आहे. श्रीकांत आणि त्याचे वडील शिवराम हे दिवसभर शेतात असतात. पुढील वर्षी या कलमांना आंबे धरणार आहेत. काही कलमांवर मोहोर असला तरी पूर्ण वाढ होईपर्यंत फळधारणा करण्यात येणार नाही, असे त्याने सांगितले. या प्रयोगासाठी स्थानिक कृषी सहाय्यक सुस्तरफेड यांचेही मार्गदर्शन सुरू असते. त्याने अधिकृत नर्सरीची निर्मिती करून त्यात ८ हजार काजू आणि ५ हजार आंबा कलमांची निर्मिती केली आहे. 


इस्रायली पद्धत म्हणजे काय? 
इस्रायली पद्धतीत घन पद्धतीने आंबा लागवड करतात. कलमांची उंचावर वाढ होऊ दिली जात नाही. दोन ओळींमध्ये १० फुटांचे, तर दोन झाडांत केवळ तीन फुटांचे अंतर असते. कलम जोर धरू लागले, की यात फांद्यांची छाटणी महत्त्वाची ठरते. आतापर्यंत गेल्या १९ महिन्यांत या बागेत सात वेळा छाटणी झाली असून, यामुळे रोपं जागेवरच बहरली आहेत. याचा फायदा झाडांची उंची केवळ पाच ते सहा फूटच राहून त्याची निगा राखणे व फळ काढण्यासाठी उंचावर जाण्याची गरज लागत नाही. एका झाडाला एका वेळेला कमीत कमी ६०, तर जास्तीत जास्त १५० आंबे मिळतात. इथे एका रांगेत तीन फुटांचे अंतर ठेवून ४५ कलमांची लागवड असून, हा कोकणातील पहिलाच प्रकल्प ठरला आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.