मानलं पोरी! रिक्षा चालक वडिलांच्या कष्टाचं चीज झालं, रायगड कन्या ८ वर्ष खडतर मेहनत घेऊन झाली CA

Pali Latest Update: तिची आई गृहिणी, वडील रिक्षा चालक आहेत. तिला एक भाऊ व तीन बहीणी आहेत.
 Chatali of pali became ca success story of riksha driver daughter
Chatali of pali became ca success story of riksha driver daughter sakal
Updated on

Raigad Latest Update: प्रतिकूल परिस्थितीवर मात करूननिश्चित ध्येयाने मार्गक्रमण करीत खडतर मेहनत जिद्द व चिकाटीने पालीतील शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी चैत्राली निगडे सीए झाली आहे. तिचे वडील रिक्षा चालक आहेत. पालीवाला महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातर्फे मंगळवारी (ता.23) चैत्रालीचा सन्मान करण्यात आला.

यावेळी चैत्रालीने आपल्या या यशाचा खडतर प्रवास उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थ्यांना सांगितला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच तिला मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकांचे आभार मानले.

 Chatali of pali became ca success story of riksha driver daughter
Success Story: महिलांच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या ‘योगिनी’ ; योग अभ्यासाच्या वर्गातून मिळविला रोजगार!

सुधागड एज्युकेशन सोसायटीचे सचिव रविकांत घोसाळकर, प्राचार्य डॉ. सुधाकर लहूपचांग यांच्या हस्ते भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन तिचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. स्नेहल बेलवलकर, प्रा. संतोष भोईर, प्रा. कृष्णा जांबेकर, प्रा. डॉ. भारती आरोटे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अनिल झेंडे , ग्रंथालय प्रमुख लिंताज उके, प्रा. जालेंदर कालकुटे, चैत्रालीचे आई व वडील, भाऊ, बहिण व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाणिज्य विभागाचे प्रा. संतोष भोईर व आभार प्रा. कृष्णा जांबेकर यांनी केले. महाड-माणगाव-पोलादपूर चे आमदार भरत गोगावले यांनी सुद्धा चैत्राली हिचा सन्मान केला आहे. तसेच सुएसोचे अध्यक्ष वसंतराव ओसवाल, उपाध्यक्ष रवींद्र लिमये, कार्यवाह गीता पालरेचा यांनी सुद्धा अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 Chatali of pali became ca success story of riksha driver daughter
Success Story: राज्यात 'या' ठिकाणी बनलेले बाप्पा पोहचले फॉरेनला; शेट्टी दाम्पत्याकडे मूर्तींची मागणी वाढती !

चैत्रालीचा खडतर प्रवास

चैत्राली बाळू निगडे हिचे माणगाव तालुक्यातील भिरा (विठ्ठलनगर) हे छोटेसे निसर्गाच्या कुशीत लपलेले मुळगाव आहे. तिची आई गृहिणी, वडील रिक्षा चालक आहेत. तिला एक भाऊ व तीन बहीणी आहेत.

 Chatali of pali became ca success story of riksha driver daughter
Success Story: शिक्षणाची जिद्द असलेली ठाण्याची नूरजहाँ बनली एकलव्य! संर्घष वाचून तुम्हाला वाटेल अभिमान

चैत्रालीचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण टाटा विद्यालय भिरा येथे झाले. तर 11 वी, 12 वी सुऐसो. ज्युनियर कॉलेज कोलाड येथे, तर पदवीचे शिक्षण ज. नौ. पालीवाला कॉलेज पाली येथे झाले. तिने युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई मधून पदव्युत्तर पदवी मिळवली.

चैत्राली सीए होण्यासाठी 8 वर्ष मेहनत घेत आहे. या परीक्षेत तिला चार वेळा अपयश देखील आले. मात्र तिने मागे फिरून पाहिले नाही या सर्व अपयशांना पचवत कठोर मेहनत, जिद्द आणि अथक परिश्रम याच्या जोरावर अखेर तिने सीएची परीक्षा पास केली. तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ती सध्या एका खाजगी कंपनीत अकाउंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.

 Chatali of pali became ca success story of riksha driver daughter
Success Story : रिचाने कुटुंबियांचा विरोध पत्कारून उभी केली महिलांच्या अंडरगारमेंट्सची कंपनी, आज आहे कोट्यावधींची मालकीण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.