Pali Crime : पतीने पत्नीचा गळा दाबून केला खून; पोलिसांनी आरोपी पतीच्या आवळल्या मुसक्या

सुधागड तालुक्यातील नवघर ग्रामपंचायत हद्दीतील उंबरवाडी कातकरवाडी जवळील डोंगरावरील जंगलात शनिवारी (ता. 9) एका महिलेचा मृतदेह आढळला होता.
Crime
Crimesakal
Updated on

पाली - सुधागड तालुक्यातील नवघर ग्रामपंचायत हद्दीतील उंबरवाडी कातकरवाडी जवळील डोंगरावरील जंगलात शनिवारी (ता.9) एका महिलेचा मृतदेह आढळला होता. सदर महिलेच्या पतीने पत्नी हरवल्याची तक्रार पोलीस स्थानकात दाखल केली होती.

मात्र पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांनी व पोलिसांनी मृत महिलेच्या पतीची संशयास्पद वागणुक ओळखुन पोलीस खाक्या दाखविल्यावर त्याने आपणच पत्नीचा गळा आवळून खून केला असल्याचे कबूल केले. यासंदर्भात मंगळवारी (ता.12) पाली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. सागर पवार यास अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नवघर, उंबरवाडी येथील डोंगराळ भागात आदिवासी लोकांना शनिवारी (ता.9) एक महिला मृतावस्थेत असल्याचे निदर्शनास आले होते. सदर घटना पाली पोलिसांना कळताच पाली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण व त्यांची टीम घटनास्थळी पोहोचले. परंतु महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटविणे मुश्किल होते.

रविवारी (ता. 10) रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व विभागीय पोलीस अधिकारी रोहा सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली श्वान पथक, आरसीपी टीम, पाली पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी,फिंगरप्रिंट टीम, डॉक्टर व ग्रामस्थ अशी टीम घटनास्थळी जाऊन मृतदेहाचे नमुने घेऊन शवविच्छेदन करण्यात आले.

मात्र अज्ञात मृतदेहाचा तपास घेणे पोलिसांपुढे आवाहन होते. यादरम्यान आरड्याचीवाडी येथील आदिवासी महिला बेपत्ता असल्याची तक्रार तिचा पती सागर पवार याने जांभूळपाडा पोलीस चौकीत मंगळवारी (ता.5) दाखल केली होती.

त्यानुसार पोलिसांनी तक्रारदार यांच्या घरी जाऊन अज्ञात महिलेच्या अंगावरील कपडे त्या कुटुंबाला दाखवले. त्या कपड्यांच्या आधारावर ती अज्ञात महिला सागर पवार ची पत्नी कुसबा पवार असल्याचे निष्पन्न झाले. परंतु या अज्ञात मृत महिला कोण आहे याचा शोध जरी लागला असला तरी त्या महिलेच्या मृत्यूचे नेमके कारण काय याचा शोध पोलिसांनी घेण्यास सुरुवात केली.

मृत महिलेचा पती सागर पवार पोलिसांपासून काहीतरी लपवित असल्याचा संशय आला त्यानुसार पोलिसांनी सागर ची चौकशी करण्यास सुरुवात केली. अखेर सागरनेच त्याच्या पत्नीचा गळा दाबून खून केला असल्याचे त्याने कबूल केले.

म्हणून केला खून

सागर याने सांगितले की पत्नी कुसबा ही तिच्या बहीण व भावाला दिलेले पैसे परत करत नव्हती शिवाय वारंवार खर्चाकरिता पैसे मागत होती. आणि सागर याने दुसरे लग्न केले या कारणाने त्याला मानसिक त्रास देत असल्याच्या रागाने सागर याने पत्नीचा खून केला असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.