Leopard : सुधागड तालुक्यात बिबट्याची दहशत; अनेक बकऱ्या व जनावरे केली फस्त

सुधागड तालुक्यात घोटवडे तसेच मानखोरा विभागात बिबट्याचा वावर असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
Leopard
leopardsakal
Updated on

पाली - सुधागड तालुक्यात घोटवडे तसेच मानखोरा विभागात बिबट्याचा वावर असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत स्थानिक लोकांकडून वन विभागाकडे तक्रार आल्याने तत्काळ दखल घेऊन या ठिकाणी वन विभागातर्फे सावधानतेचा इशारा व खबरदारीचे उपाय सांगण्यात आले असून त्या स्वरूपाचे फलक देखील लावण्यात आले आहेत.

तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी तरसे तसेच वन्यजीव परिक्षेत्र अधिकारी विकास तरसे यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर विषयाची माहिती घेतली असता, ग्रामस्थांकडून सांगण्यात आले की, या परिसरात बिबट्या फिरत आहे. त्यामुळे आमच्या बकऱ्या, गुराढोरांना धोका आहे. आमची जनावरे व बकऱ्या बिबट्याने मारली आहेत. वनविभागाने त्यानुसार दखल घेऊन मागील चार दिवसांपासून उपायोजना चालू केली आहे.

अश्विनी तरसे या स्वतः गेले चार दिवसापासून या विभागात दिवसा व रात्री चारवेळा गस्त मारत आहेत. तसेच वनपाल व वनरक्षक यांची टीम या विभागात गस्त घालण्यासाठी कार्यरत ठेवली आहे. तसेच रात्री बिबट्या गावात येऊन म्हणून वनरक्षकांकडे फटाके देऊन परिसराच्या आजूबाजूला रात्री 10,11,12 दरम्यान फटाके वाजवण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे बिबट्या शिकारीसाठी गावात न येता लांब पळून जाईल त्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे.

ही घ्या खबदारी

वन विभागाने सांगितले आहे की खबरदारीचे उपाय म्हणून रात्री घराबाहेर पडू नका, आवश्यक असल्यास गटा गटांनी हातात काठी बॅटरी घेऊन बाहेर पडा. रात्री कुत्रे जोर जोराने भुंकत असल्यास बिबट्या जवळ असण्याची दाट शक्यता आहे.

त्यामुळे शेळ्या, मेंढ्या, गाय म्हैस, कोंबड्या बंद गोठ्यात ठेवाव्यात, बिबट्या सहसा जाणीवपूर्वक माणसावर हल्ला करत नाही. बिबट्याला हाकलण्यासाठी त्याला दगड मारू नये व त्याचा पाठलाग करू नये ते आपणास धोकेदायक ठरू शकते, बिबट्या आल्यास भांडी वाजवा, फटाके वाजवा, जोर जोराने आरडा ओरड करा, घराच्या बाजूने रात्रीच्या वेळी लाईट चालू ठेवावी.

अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक

बिबट्या हा अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे. त्याचे अस्तित्व कमी झाले तर अन्नसाखळीतील इतर प्राण्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. बिबट्या हा अनुसूची एक मधील वन्य प्राणी असल्याने या वन्य प्राण्यास शिकार करणे किंवा इजा करणे किंवा शिकारीचा प्रयत्न करणे हा वन्य जीव (संरक्षण) अधिनियम 1972 मधील कलम 9 अन्वये गुन्हा आहे.

बिबट्या आपल्या विभागात वावरत असल्याने आपल्यावर बिबट्याचा हल्ला होऊ नये म्हणून नियमांचे पालन करून काळजी घ्यावी. तसेच या परिसरात स्पीकरद्वारे रोज अनाउन्समेंट करण्यात येत आहे. काही संशय आल्यास वन विभाग हेल्पलाइन क्र.1926 ला संपर्क करावे किंवा वनपाल घोटावडे 9667961229 वनरक्षक 7039081524/7710054024 या क्रमांकावर संपर्क करावे.

- अश्विनी तरसे, तालुका वन परिक्षेत्र अधिकारी,

- विकास तरसे, तालुका वन्यजीव परिक्षेत्र अधिकारी

सुधागड तालुक्यात बिबट्याने बकऱ्या व वासरे मारण्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. काही दिवसांपूर्वी वासुंडे गावात वासरू व बकऱ्या मारल्याचे कळते. तसेच पाली बैठक हॉल जवळ 7 ते 8 बकऱ्या मारल्या होत्या. यासंदर्भात प्रत्येक गावात जनजागृती व माहिती पोहोचवावी, मी सुधागड तालुका वन अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे.

- राजेंद्र राऊत, शिवसेना (उबाठा) उपजिल्हा संघटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.