Guhagar : लग्न जमत नव्हते म्हणून मानसिक तणावातून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

गेली दोन वर्षे प्रशांतचे लग्न जमत नव्हते. त्यामुळे तो मानसिकदृष्ट्या खचला होता.
Crime News
Crime Newsesakal
Updated on
Summary

प्रशांत मारुती कदम याचे मुळगाव कनार्टक राज्यातील काटगाळी (खानापूर, जि. बेळगांव) हे आहे. गेली १० वर्ष तो आपल्या मामाकडे दत्ता सोनाप्पा घाडी यांच्या पालपेणे येथे राहतो.

गुहागर : तालुक्यातील शृंगारतळी-पालपेणे रस्त्यावरील दत्ता सोनाप्पा घाडी यांच्या घरात त्यांचा भाचा प्रशांत मारुती कदम (वय २७) याने सोमवारी (ता. १९) गळफास घेऊन आत्महत्या केली. गेले काही दिवस मानसिक तणावाखाली असल्याने त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज फिर्यादी दत्ता घाडी यांनी आपल्या जबाबात वर्तवला आहे.

प्रशांत मारुती कदम याचे मुळगाव कनार्टक राज्यातील काटगाळी (खानापूर, जि. बेळगांव) हे आहे. गेली १० वर्ष तो आपल्या मामाकडे दत्ता सोनाप्पा घाडी यांच्या पालपेणे येथे राहतो. दत्ता घाडी यांनी प्रशांतला आपल्या घरामधील वरच्या मजल्यावर राहण्यासाठी खोली दिली आहे. बांधकाम कामगार म्हणून काम करतो.

Crime News
Satara Politics : आम्हाला बेअक्कल म्हणता, मग लोकसभेला का पडलात? शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंवर निशाणा

सोमवारी (ता. १९) सकाळी नेहमीप्रमाणे तो शृंगारतळी येथील बेलवलकर यांच्या दुकानाचे काम करण्यासाठी गेला. मात्र सकाळी १० च्या दरम्यान डोके दुखत असल्याचे सहकारी उम्मीद सिंग याला सांगून तो कामावरुन घरी येवून आपल्या खोलीत गेला. दुपारी जेवणाची वेळ झाली म्हणून दत्ता घाडी त्याला बोलावण्यासाठी वरच्या मजल्यावर गेले.

Crime News
Udayanaraje Bhosale : 'माझ्यात आणि देसाईंमध्ये जुंपून देण्याचं काम, स्वत:चा उदो उदो करून घेणारा मी नाही'

त्यावेळी प्रशांत कदमच्या खोलीला समोरच्या व मागच्या दरवाजाला आतून कडी असल्याचे असल्याचे लक्षात आले. त्याने कॉलही उचलला गेला नाही. अखेर दत्ता घाडी यांनी कर्मचाऱ्यास मागील दरवाज्याजवळची खिडकीची काच फोडण्यास सांगितले. त्यावेळी प्रशांत कदमने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

Crime News
Shivaji University : पदवीधरांसाठी महत्वाची बातमी! शिवाजी विद्यापीठ 'हे' डिग्री सर्टिफिकेट देणार ऑनलाईन

याची खबर देताना दत्ता घाडी यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे, गेली दोन वर्षे प्रशांतचे लग्न जमत नव्हते. त्यामुळे तो मानसिकदृष्ट्या खचला होता. त्यातच प्रशांतच्या मुळगावी राहणारा मोठा भाऊ गेले सात दिवस बेपत्ता आहे. या दोन्ही गोष्टीमुळे मानसिक तणावामध्ये त्याने आत्महत्या केली असावी. या प्रकरणाचा अधिक तपास लुकमान तडवी व कुमार घोसाळकर करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()