'राजकारणात भाजपची अवस्था म्हणजे पाण्यातून बाहेर पडलेला मासा'

विरोधकांना सतरा शून्य असे पराभूत करून गाडून टाकल्याचा निकाल द्या, अनामत रक्कमसुद्धा जप्त करा.
politics
politicsesakal
Updated on
Summary

विरोधकांना सतरा शून्य असे पराभूत करून गाडून टाकल्याचा निकाल द्या, अनामत रक्कमसुद्धा जप्त करा.

मंडणगड : येथील नगरपंचायत निवडणुकीत (nagar panchayat election 2021) शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीच्या (mahavikas aaghadi sarakar) अधिकृत उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करून विरोधकांना सतरा शून्य असे पराभूत करून गाडून टाकल्याचा निकाल द्या व विरोधकांची अनामत रक्कमसुद्धा जप्त करा. संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यास तो हाणून पाडा. मंडणगड (manadangad) नगरंपचायतीच्या या निवडणुकीत माजी आमदार संजय कदम व माजी आमदार सूर्यकांत दळवी (Surykanat dalavi) या दोघांनी कायम एकत्र राहून विरोधकांचा बँड वाजवावा, असे आवाहन खासदार सुनील तटकरे (sunil tatakare) यांनी केले.

politics
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं; सख्खे 4 भाऊ 'आमदार'

महाविकास आघाडीच्या मंडणगड येथील प्रचार सभेत बोलताना राज्याच्या राजकारणात भाजपची अवस्था पाण्यातून बाहेर पडलेल्या माशासारखी झाल्याची टीकाही त्यांनी केली. तटकरे म्हणाले, राज्यात झालेल्या महाविकास आघाडीचा फॉर्म्युला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वापरून विकासाला नवीन दिशा देण्याचे काम महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार शरद पवार यांनी केले आहे.

भाजपला खेड्यापाड्यात रूजवण्याचे, वाढवण्याचे श्रेय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आहे. याचा विसर या पक्षाच्या नेत्यांना पडेलला आहे. पण लक्षात ठेवा सत्तेची बेरीज कशी करायची याचा पाढा व आदर्श राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घालून दिला. केंद्राने सतत जीएसटीचा परतावा अडवण्याचे काम केले; मात्र राज्यातील विकासकामांवर कोणताही परिणाम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाणवू न दिल्याने विकासाच्याबाबतीत अनेक संकटे असतानाही विकासात महाराष्ट्र अग्रेसर आहे. या प्रचार सभेस राष्ट्रवादी माजी आमदार संजय कदम, शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी, सेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संदीप राजपुरे, जिल्हा परिषद सदस्य संतोष गोवळे, माजी उपजिल्हाप्रमुख राजकुमार निगुडकर आदी उपस्थित होते.

politics
किरीट सोमय्यांना उत्तर द्यायला मी बांधील नाही; अनिल परब

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.