Maratha Community in Chiplun
Maratha Community in Chiplunesakal

Maratha Reservation : आरक्षणाच्या मागणीवरून मराठा समाजात पडले दोन गट; एकाचा जरांगेंना पाठिंबा, तर दुसऱ्या गटात निरुत्साह

आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू ठेवलेल्या उपोषणाला येथील समाजबांधवानी पाठिंबा दिला.
Published on
Summary

आरक्षणाच्या मागणीवरून येथील मराठा समाजात दोन गट पडले आहेत.

चिपळूण : मराठा समाजाला (Maratha Community) आरक्षण मिळण्यासाठी तालुक्यातील सकल मराठा समाजबांधवांनी गुरुवारी प्रांत कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी सुरू ठेवलेल्या उपोषणाला येथील समाजबांधवानी पाठिंबा दिला.

Maratha Community in Chiplun
Kolhapur Crime : धक्कादायक! दारूसाठी पोटच्या पोरानं घोटला आईचा गळा; चेहऱ्यावर जखमा, कानातून आलं रक्त

पोवाड्यासह शौर्यगीतांचे गायन करून समाजबांधवांमध्ये चैतन्य निर्माण करण्यात आले. उपोषणस्थळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. तालुक्यात मराठा समाजाची लोकसंख्या जास्त आहे; मात्र उपोषणस्थळी अपेक्षित गर्दी झाली नसल्याचे दिसून आले.

Maratha Community in Chiplun
Raju Shetti : 'जोपर्यंत तोडगा निघणार नाही, तोपर्यंत कारखाने सुरू करू देणार नाही'; राजू शेट्टींचा कारखानदारांना स्पष्ट इशारा

मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळण्यासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांना जिल्ह्यात सर्वप्रथम चिपळूण तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी संयुक्त बैठक घेत पाठिंबा दिला. बैठकीत ठरल्यानुसार गुरुवारी प्रांत कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. सकाळी आठपासून उपोषणाला सुरुवात झाली. आमदार शेखर निकम, आमदार भास्कर जाधव, माजी आमदार रमेश कदम, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, उद्योजक प्रकाश देशमुख, सतीश मोरे, सतीश कदम आदींसह समाजबांधव उपोषणात सहभागी झाले.

उपोषणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन-तीन दिवसांपासून तयारी केली जात होती. आरक्षणाच्या मागणीवरून येथील मराठा समाजात दोन गट पडले आहेत. उपोषणात एका गटाचे लोक सहभागी नसल्याचे दिसून आले. उपोषणस्थळी पोवाड्याचे आयोजन केले होते. खेड तालुक्यातील शाहीर साळवी यांनी भारदस्त आवाजात पोवाडा सादर केला तर महिलांनी जिजाऊ गीताचे गायन केले. या वेळी शौर्यगीतांचे गायनदेखील करण्यात आले.

Maratha Community in Chiplun
Maratha Reservation : 'आम्ही 96 कुळी मराठा आहोत, कुणबी प्रमाणपत्र घेण्यास आमचा विरोध'; मराठा समाजाच्या बैठकीत ठराव

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी एक मराठा, लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय आदी जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. मराठा समाजास आरक्षण का हवे, शासनाकडून होणारा विलंब आदींबाबत विविध मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. मराठा समाजातील विदारक स्थिती त्यांनी मांडली. शहरासह तालुक्यातील समाजबांधव उपोषणात सहभागी झाले होते.

पोलिस बंदोबस्त

राज्यात काही ठिकाणी लोकप्रतिनिधींची घरे आणि कार्यालयावर हल्ले झाले आहेत. उपोषणस्थळापासून जवळच आमदार निकमांचे संपर्क कार्यालय असल्याने येथे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.