प्रशासन सतर्क; भूस्खलन झालेल्या 109 ठिकाणांचे होणार सर्वेक्षण

प्रशासन सतर्क; दरडग्रस्त भागातील कुटुंबांच्या पुनर्वसनाच्या हालचाली
प्रशासन सतर्क; भूस्खलन झालेल्या 109 ठिकाणांचे होणार सर्वेक्षण
Updated on

रत्नागिरी : जुलै महिन्यात सलग मुसळधार पाऊस पडल्यामुळे सह्याद्रीच्या खोऱ्या‍तील पोसरे, बाऊलवाडी, पेढे, तिवरे, दख्खनमधील गावांसह अनेक ठिकाणी दरडी कोसळून जमिनीला भेगा पडल्या आहेत. जीवितहानी टाळण्याच्या उद्देशाने बाधित ठिकाणांचा पुणेच्या भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाकडून सर्व्हे केला जाणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून १०९ बाधित ठिकाणांची यादी पाठवण्यात आली आहे. तसेच धोकादायक आणि दरडग्रस्त भागातील कुटुंबांचे तात्पुरत्या व कामयस्वरूपी पुनर्वसनही केले जाणार आहे.

सलग पडलेल्या पावसामुळे यंदा मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. पोसरे, पेढे येथे जीवितहानीही झाली. हे प्रकार टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तत्काळ संबंधित ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यासाठी पावले उचलली आहेत. पुणे येथील भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने पूर्वी बाधित झालेल्या ४५ गावांचा अभ्यास केला होता. भूवैज्ञानिक मानांकाच्या आधारे उच्च प्रवणतेनुसार १ ते ४ वर्गवारीही केली. तेथील ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याबाबत प्रांताधिकारी आणि तहसीलदारांना जिल्हा प्रशासनाने सूचना दिल्या आहेत. त्या व्यतिरिक्त यंदा भूस्खलन, दरड कोसळल्याने धोकादायक गावांचे सर्वेक्षण करण्यासाठी वरिष्ठ भूवैज्ञानिक आणि पुणेतील भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाला पत्र पाठविण्यात आले आहे. त्या गावातील ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करावे आणि कोणत्याही प्रकारे जीवितहानी होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत तहसीलदार यांनी 'इन्सिडंट कमांडर' या नात्याने आवश्यक ते आदेश काढावेत, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

अतिवृष्टीमुळे पोसरे खुर्द (ता. खेड) येथील दरड कोसळून पूर्णतः जमीनदोस्त झालेली ८ आणि पोसरे बुद्रुक येथील १ अशी एकूण ९ कुटुंबे आहेत. त्या ठिकाणी पुन्हा भूस्खलनाचा धोका असल्यामुळे १२ कुटुंबे आणि पेढे कुंभारवाडी (ता. चिपळूण) येथील दरड कोसळून पूर्णतः क्षतिग्रस्त झालेली ५ कुटुंबे अशा एकूण २६ कुटुंबांचे तात्पुरते पुनर्वसन अलोरे (ता. चिपळूण) येथील कोयना प्रकल्पाच्या शासकीय वसाहतीमधील रिक्त निवासस्थानी करण्यात येत आहे. कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी सुरक्षित शासकीय आणि खासगी जागा निश्‍चित करून पुनर्वसन प्रस्ताव सादर करण्याचे आदेश प्रांताधिकारी व खेड तहसीलदार यांना जिल्हा प्रशासनाकडून दिले आहेत.

प्रशासन सतर्क; भूस्खलन झालेल्या 109 ठिकाणांचे होणार सर्वेक्षण
सोशल मीडियावरून समर्थकाला धमकी ; राजापूरात वातावरण तापले

तालुका सर्वेक्षणासाठीची ठिकाणे

* संगमेश्‍वर २१

* चिपळूण ३

* दापोली ६

* खेड २५

* गुहागर २३

* रत्नागिरी ४

* राजापूर ९

* लांजा ४

* मंडणगड १४

एकूण १०९

जास्त धोकादायक सहा गावे

जिल्ह्यातील ४५ गावांत भूवैज्ञानिक सर्वेक्षण झाले आहे. त्यांनी केलेल्या प्रतवारीनुसार जास्त धोकादायक ६ गावे असून, त्यात खोरनिनको-मुसळेवाडी, ताम्हाणे, गोवळकोट, उंबरवाडी, पायरवाडी शेल्डी, पाजपंढरी यांचा समावेश आहे, तसेच जास्त ते मध्यम धोकादायक गावे ४, मध्यम धोकादायक ३० तर कमी धोकादायक गावे ५ आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.