समुद्रकिनारी रापणीत अडकलेल्या डॉल्फिनला जिवदान

रापणीत अडकले तीन मासे; मच्छीमारांनी दिले जिवदान
समुद्रकिनारी रापणीत अडकलेल्या डॉल्फिनला जिवदान
समुद्रकिनारी रापणीत अडकलेल्या डॉल्फिनला जिवदानsakal
Updated on

वेंगुर्ले : मोचेमाड समुद्रात पारंपारिक मासेमारी पद्धतीने करण्यात येत असलेल्या रापण या मासेमारी प्रकारातील जाळ्यात आज तीन मोठे डॉल्फिन मासे सापडून आले. रापण संघाच्या सदस्यांनी या डॉल्फिन माशांना जाळ्यातून सुखरूप बाहेर काढून पुन्हा समुद्रात सोडत जीवदान दिले. रापणीच्या जाळ्यात सापडलेल्या या डॉल्फिन माश्यांना पाहण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी समुद्रकिनाऱ्यावर एकच गर्दी केली होती.

मालवणच्या चिवला बीचवर गेल्याच आठवड्यात असाच प्रकार घडला होता. तेथील न्यू रापण संघ रेवतळे यांनी लावलेल्या रापणीत चक्क ८ ते १० छोटे, मोठे डॉल्फीन सापडून आले. रापण संघाच्या सदस्यांनी या डॉल्फीन माशांना जाळ्यातून सुखरूप बाहेर काढत पुन्हा समुद्रात सोडत जीवदान दिले होते. त्या पाठोपाठ आता मोचेमाडमध्येही असाच प्रकार घडला.

समुद्रकिनारी रापणीत अडकलेल्या डॉल्फिनला जिवदान
नांदेड : तूरीवरील शेंगा पोखरणा-या अळयांचे व्यवस्थापन आवश्यक

मोचेमाड येथील समुद्रात पारंपरिक रापण पद्धतीची मासेमारी केली जाते. रोजच्याप्रमाणे श्री समर्थ रापण संघाच्या सदस्यांनी सकाळी समुद्रात रापणीची जाळी टाकली व ती बऱ्याच वेळाने सदस्यांनी ओढत किनाऱ्यावर आणली असता, त्यात चक्क मोठे तीन डॉल्फिन मासे असल्याचे दिसून आले. त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता अडकलेल्या तीनही डॉल्फिन माशांना जाळ्यातून सुखरूप बाहेर काढत पुन्हा समुद्रात सोडून देत त्यांना जीवदान दिले. या डॉल्फिन माशांना रापण संघातील सदस्य महादेव तांडेल, विपुल पवार, रमाकांत कोचरेकर, सागर कोचरेकर, जयेश तांडेल, नारायण आरावंदेकर, पियेश तांडेल, आनंद सातोस्कर, जगन्नाथ तांडेल, संतोष पवार, चिन्मय कुर्ले, साहिल कुबल या मच्छीमार बांधवांनी सुखरूप समुद्रात सोडून जीवदान दिले. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

डॉल्फीन दर्शन थेट किनाऱ्यावरच

हिवाळ्यात हे डॉल्फिन मासे समुद्रात मोठ्या प्रमाणात दृष्टीस पडत असतात. समुद्रात डुबक्या मारत हे डॉल्फिन थव्याने फिरत असतात. काही ठिकाणी तर हे डॉल्फिन दर्शन घेण्यासाठी पर्यटक होडीतुन समुद्रात फेरफटका मारतात; परंतु इथे तर चक्क डॉल्फिनच जाळ्यात सापडले असल्याने माश्यांना पाहण्यासाठी समुद्रकिनारी गर्दी झाली होती.

या दिवसात डॉल्फिनचे कळप प्रजनन क्रियेसाठी समुद्र किनाऱ्यालगत येतात किंवा एखाद्या माशांची शिकार करायची असल्यास ते आपल्या एक आवाजाची विशिष्ट खूण करून इतर डॉल्फिनना बोलावतात. त्यातील काही डॉल्फिन हे मागे चुकून राहिल्यास असे मच्छिमारांच्या जाळ्यात अडकतात. हे मादी डॉल्फिन होते. ते मच्छिमार जाळ्यांना कोणतेही नुकसान करत नाहीत; मात्र यातील दुसऱ्या जातीचे डॉल्फिन जाळ्यात अडकल्यास ते जाळी तोडून बाहेर पडतात. त्यामुळे मच्छिमार जाळ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते.

- रुपेश मोर्जे, स्थानिक मच्छिमार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.