ZP शाळेत चाललंय तरी काय? विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करणारा 'तो' शिक्षक निलंबित, शिक्षण विभागाची कारवाई

Zilla Parishad Primary School : अश्लील चाळे केल्याप्रकरणी पोलिसांनी (Ratnagiri Police) शिक्षक संजय मुळ्ये याला अटक करून त्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला.
Ratnagiri Crime
Ratnagiri Crimeesakal
Updated on
Summary

संबंधित शिक्षकाने यापूर्वीही असा प्रकार केल्याचे चौकशी अहवालात पुढे आले आहे. त्याची गंभीर दखल शाळेतील वरिष्ठांनी घेतली नाही.

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील (Zilla Parishad Primary School) विद्यार्थिनींशी (Student) अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकावर प्राथमिक शिक्षण विभागाने तत्काळ निलंबनाची कारवाई केली आहे, असे शिक्षणाधिकारी भिकाजी कासार यांनी सांगितले. तसेच हे प्रकरण माहिती असतानाही संबंधित शिक्षकावर कारवाई केली नसल्याचा ठपका ठेवत मुख्याध्यापकालाही निलंबित केल्याचे कासार यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.