भाजीपाला, फुलशेतीतून वर्षभर उत्पन्नाचे साधन

कसोपात चेतन साळवींचा प्रयोग; एकात्मिक शेतीला प्राधान्य, उत्पादन वाढविणार
Vegetable and  flower farming pavas
Vegetable and flower farming pavas sakal
Updated on

पावस : पारंपरिक पद्धतीने भातशेतीचा वसा जपतानाच बाजारात मागणी असलेल्या भाजीपाला, फुलशेतीमधूनही महिन्याला हजारो रुपयांच्या उत्पन्नाचे साधन कसोप (ता. रत्नागिरी) येथील तरुण चेतन साळवी याने निर्माण केले आहे. शेती आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, अशी मानसिकता बदलण्यासाठी चेतन यांचे शेतकऱ्यांपुढे आदर्शवत उदाहरण ठरले आहे.

चेतन म्हणाला, आजोबांनी, वडिलांनी पारंपरिक पद्धतीने भातशेती करत असताना पावसाळी व उन्हाळी जागेचा योग्य तऱ्‍हेने वापर करून उत्पन्नाचे साधन बनवले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर भातशेती, भाजीपाला व फुलशेती याकडे प्राधान्याने लक्ष दिले. त्यामुळे वर्षभर उत्पन्नाचे साधन बनले आहे.

गेली दहा वर्ष पारंपरिक भातशेती व भाजीपाला करीत असताना साडेचारशे आंबा कलमे व सत्तर काजू कलमांची लागवड करण्यात आली. त्यातून दरवर्षी उत्पन्न मिळते. त्याचबरोबर तीनशे नारळाची झाडे असून महिन्याला ५०० नारळ मिळतात. त्याचे महिन्याला सहा ते सात हजार उत्पन्न मिळते. पारंपरिक पाच एकर भात शेतीमध्ये ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरणी करून सुमारे आठ खंडी म्हणजेच चार हजार आठशे किलो भात हमखास मिळते.

पावसाळ्यामध्ये भाजीपाला करतो. दोन एकर परिसरात पडवळ, दोडका, कारली, काकडी, मुळा, पालाभाजी याची दरवर्षी लागवड केली जाते. उन्हाळ्यामध्ये वांगी, गवार, भेंडी, पडवळ, दोडका, कारली, काकडी अशाप्रकारे तीन एकर परिसरात लागवड करतो. त्याची विक्री रोज रत्नागिरी बाजारपेठेत ठरलेल्या दुकानदारांना वर्षाच्या बाराही महिने उत्पादन विक्रीसाठी दिले जाते. साखळी पद्धतीने उत्पादन घेतो. भाजीपाल्यातून महिन्याला एक ते दीड हजार रुपयांचे उत्पन्न मिळते.

एका जोडीला १३ रुपये

२० गुंठे परिसरात लीलीची लागवड करण्यात आली आहे. दिवसाला पन्नास-साठ जुड्या मिळत असतात. एका जोडीला १३ रुपये मिळतात. सहा गुंठेमध्ये कुंदाची म्हणजेच कागडाची लागवड केली. त्याची हजार रुपये किलोनी विक्री होते. फुलशेतीतून महिन्याला पंचवीस ते तीस हजार रुपये उत्पन्न मिळते.

एक नजर..

  • सहा गुंठेमध्ये कुंदाची लागवड

  • नारळ, आंबा, काजूतून ठोक उत्पन्न

  • कुंदाच्या फुलांच्या विक्रीचा प्रयोग यशस्वी

घरातील आठ माणसे तेथे राबत असतात. पाण्याचा साठा विपुल प्रमाणात असल्यामुळे बारमाही उत्पन्न घेता येते. सुरवातीला शेणखत व गांडूळ खत वापरले जाते. कीटकनाशकाची फवारणी अल्प प्रमाणात केली जाते. यावर्षी कृषी विभागातर्फे मोफत भाजी बियाणे देण्यात आली. गांडूळ खत निर्माण करण्यासाठी अनुदान देण्यात आले. येत्या काही दिवसांत त्याचा उपयोग करून घेणार आहे.

- चेतन साळवी, कसोप

- सुधीर विश्वासराव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.