कुडाळ (सिंधुदुर्ग) : तौक्ते चक्रीवादळाच्या(tauktae cyclone) तडाख्याने अंधारात गेलेली पांग्रड व निरुखे(pangrad,nirukhe) ही दोन्ही तब्बल बारा दिवसांनी प्रकाशमान झाली. यासाठी दोन्ही गावातील ६० युवकांसह शहरातील वीज कर्मचाऱ्यांनीसुद्धा मोलाचे सहकार्य केले. tauktae-cyclone-impact-pangrad-and-nirukhe-due-to-the-electricity-kokan-news
‘तोक्ते’ चक्रीवादळ व मुसळधार पावसाचा फटका सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या पांग्रड व निरुखे या दोन्ही गावांना बसला. या भागात ठिकठिकाणी वादळाने झाडे पडल्याने भडगाव तिठा ते पांग्रडपर्यंत ३० विजेचे खांब जमीनदोस्त झाले होते. १२ दिवस दोन्ही गावे अंधारात होती. सर्वच व्यवहार ठप्प झाले. महावितरणचे कर्मचारी आपल्यापरीने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत होते; मात्र अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे त्याला मर्यादा येत होती. ही बाब लक्षात घेऊन दोन्ही गावांतील ६० युवकांनी सहकार्य केले. पांग्रड-मुंबई ग्रामस्थ मंडळाचे विजय मर्गज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे काम केले.
दोन्ही गाव भौगोलिकदृष्ट्या डोंगराळ असल्याने वीज खांबांची खांद्यावरून वाहतूक करणे, खड्डे खोदणे आदी कामेही या युवकांनी केली. सलग ८ दिवस हे काम चालले होते. महावितरणच्या स्थानिक कर्मचाऱ्यांसह वरिष्ठ अधिकारीही ठाण मांडून होते. यामध्ये अधीक्षक अभियंता विनोद पाटील, कार्यकारी अभियंता रमेश लोकरे, कडावलचे शाखा अभियंता अमित तारापुरे यांचा समावेश होता. ठेकेदार वेंगुर्लेकर यांच्या टीमनेही मेहनत घेतली. दोन्ही गावातील युवक व ग्रामस्थांबरोबरच वीज कर्मचारी अंकुश चव्हाण, फोरमन कुमार, लाईनमन जाधव, पणदूरकर, मारुती मेस्त्री, नरेंद्र चव्हाण, मोहन मेस्त्री, सोनु मर्गज, अजय चव्हाण यांचाही सहभाग होता. वीज कर्मचारी अंकुश चव्हाण, नरेंद्र चव्हाण, मारुती मेस्त्री यांनी ग्रामस्थांना सहकार्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.