'परिपत्रकाचा अर्थ आपल्या सोयीने नको'

तौक्‍ते चक्रीवादळ; दापोलीतील शासकीय खात्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
'परिपत्रकाचा अर्थ आपल्या सोयीने नको'
Updated on

दाभोळ : राज्यात सर्वत्र कृषिसेवा व शेतीशी संबंधित दुकाने सुरू आहेत; मात्र रत्नागिरी (ratnagiri district) जिल्ह्यात तसेच दापोली शहरातील (dapoli) ही दुकाने बंद असल्याने शेतकऱ्यांचे ऐन लागवडीच्या काळात हाल होत असून शासकीय अधिकाऱ्यांनी शासन परिपत्रकाचा आपल्या सोयीने अर्थ लावू नये, असा इशारा रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे (MP sunil tatkare) यांनी अधिकाऱ्यांना दिला.

खासदार तटकरे यांनी तौक्‍ते वादळ (tauktae cyclone) व कोविड (covid-19) या विषयासंदर्भात दापोलीतील शासकीय खात्यांच्या अधिकाऱ्यांची काल (२२) आढावा बैठक घेतली. या वेळी पंचायत समितीचे माजी सभापती राजेश गुजर यांनी, दापोलीमध्ये शेतीसेवा केंद्रे बंद असल्याचे खासदारांच्या निदर्शनास आणून दिले. यावर तटकरे म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये (maharashtra) कृषी व त्या संदर्भातील सर्व सेवा देणारी दुकाने ही सुरू आहेत. रायगड जिल्ह्यातही ही सेवा सुरू असताना रत्नागिरी जिल्ह्यात मात्र वेगळे निकष का? या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांजवळ तटकरे यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली व तातडीने याबाबत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यास सांगितले.

'परिपत्रकाचा अर्थ आपल्या सोयीने नको'
केळीच्या बागेत कलिंगडचे आंतरपीक; एकरी 32 टनाचे विक्रमी उत्पन्न

साधनसामग्री घेण्यासाठी जिल्हा नियोजनमध्ये पैसे उपलब्ध असून त्याचा वापर अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने करावा. त्याचप्रमाणे लसीकरण हे त्या-त्या विभागात करतानाच त्याचे योग्य नियोजन करावे, असेदेखील तटकरे यांनी सांगितले. लॉकडाउनच्या काळामध्ये दापोली पोलिसांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे तटकरे यांनी सांगतानाच दापोलीचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचे या बैठकीदरम्यान विशेष अभिनंदन केले.

खासगी रुग्णवाहिकादेखील घ्या

दापोली तालुक्‍यात सुमारे ५५० कोरोनाचे ऍक्‍टिव्ह पेशंट असून सध्या असलेली कोविड रुग्णालये या रुग्णांना सेवा देण्यास अपुरी पडत आहेत. त्यामुळे दापोलीत आणखी १०० बेडचे कोविड सेंटर सुरू करण्याच्या सूचना तटकरे यांनी देतानाच, त्या रुग्णांना विविध भागातून दापोलीत आणण्यासाठी खासगी रुग्णवाहिकादेखील भाडेतत्त्वावर घ्याव्यात, असे सांगितले.

'परिपत्रकाचा अर्थ आपल्या सोयीने नको'
जगात सर्वाधिक लसीकरण झालेल्या देशात कोरोना का वाढतोय?

कोणाचीही तक्रार येऊ नये..

तौक्‍ते वादळासंदर्भात आढावा घेताना ज्या लोकांचे नुकसान झाले आहे, त्याचे योग्य पंचनामे करण्याचे निर्देश देतानाच कोणाचीही तक्रार येऊ नये, याची काळजी अधिकाऱ्यांनी घ्यावी. शासन सर्वतोपरी मदतीस तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.