रत्नागिरी : "...अशी लइं वादळं(tauktae Cyclone)पाहिली', असे निधड्या छातीने सांगत वारा ओसरताच आपल्या भागातील वीज कामगारांची (Power workers) फौज घेऊन ते तौक्ते वादळानंतरच्या लढाईला सज्ज होते. मामाचे वय झाले ५९, पण झुंजायची जिद्द १९ वर्षांची. शेलारमामांच्या आवेशाप्रमाणे भर पावसात खांबावर चढून ते कामाला लागले. एकेक करीत खंडाळा परिसर विद्युतमय झाला आणि खंडाळा शाखेत कार्यरत असलेले हरिश्चंद्र भिकाजी निंगवले (Harishchandra Bhikaji Ningavale)मामांनी जिंकली वादळाशी लढाई. (tauktae-Cyclone-ratnagiri-electricity-worker-shelar-working-style-kokan-news)
निंगवले मामांच्या या जिगरबाज कामगिरीमुळे महावितरणचे शेलारमामा म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. कोकण म्हणजे निसर्गाचा थाट, दर्या, खाड्या आणि हिरव्याकंच वृक्षांचा बाज...पण हे सारे केव्हा, सर्व सुरळीत असेल तेव्हा. हाच निसर्ग जेव्हा कोपतो तेव्हा भयंकर उलथापालथ घडवतो आणि नुकत्याच झालेल्या चक्रीवादळाने दणका देऊन मानवाला जागे करतो; मात्र चिवट कोकणी माणूस झुंज द्यायला नेहमी तयार असतो. या तौक्ते वादळाने सर्वप्रथम लक्ष्य केले ते उंच झाडे, विजेचे पोल आणि तारा. प्रत्येक गावात, वाडीत वादळामुळे पडलेली झाडे, त्यामुळे मोडलेले पोल, तुटलेल्या तारा हे चित्र जिल्ह्यात दिसत होते पण वादळाचा जोर कमी होताच वीज कामगार आणि अभियंते सर्वप्रथम कामाला लागले.
नव्याने भरती झालेले, मध्यमवयीन आणि अनुभवाने शहाणे पण निवृत्तीला पोचलेले वीज कामगार भर पावसात कामाला लागले. त्यातील एक हरिश्चंद्र निंगावले मामा. खंडाळा शाखेत कार्यरत असणाऱ्या निंगावले मामाचे वय आहे एकोणसाठ पण झुंजायची जिद्द एकोणीस वर्षांची. वारा जरा ओसरताच वीज कामगारांची फौज घेऊन ते या नवीन लढाईला शेलार मामांच्या आवेशाने कामाला लागले. ज्या ठिकाणी गरज पडली त्या ठिकाणी पोलवर चढून दुरुस्ती केली. मग पुढे पुढे जात काम करत राहिले. खंडाळा परिसरातील सुतारवाडी, मिरवणे, वडवली, शिर्केवाडी, परटवणे परिसर निंगवले मामांना आता महावितरणचे शेलार मामा म्हणू लागले आहेत.
मी आहे प्रकाशदूत
निंगवले मामा आणि अशाच महावितरणच्या गावोगावी काम करणाऱ्या अनेक ध्येयवेड्या अभियंते व कामगारांमुळे दुर्गम भागातील वीजग्राहकांना आधार वाटतो आणि या ओळी यथार्थ ठरतात की, "येवोत वादळे अनंत, मी चालणार वाट, मी आहे प्रकाशदूत, प्रकाशदूत...'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.