मंडणगड (रत्नागिरी) : मंडणगड तालुका कोरोना मुक्त राहावा यासाठी गेल्या महिनाभरापासून स्थानिक प्रशासन एकमेकांच्या साथीने, सहकार्याने प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहे. तर दुसऱ्या बाजूला काही शिक्षकांच्या वर्तवणूकीमुळे अडचणीत वाढ होत असल्याचे चित्र आहे. लाँकडाऊनच्या कालावधीत सोशल डिस्टंन्सचे नियम धाब्यावर बसवून तालुक्यातील गावोगाव कांदा विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका शिक्षकास तो रहात असलेली सोसायटी व नगरपंचायतीच्या कार्यप्रणालीमुळे उजेडात आणले असून प्रशासनाने त्यांना ता.२८ एप्रिल रोजी होम कोरोन्टाईन केले आहे.शिक्षकांनी घरबसल्या केलेल्या उचापतीचे उद्योगांविषयी शहारातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
लाँक डाऊनचे कालावधीत मिळालेल्या सुट्टीत तालुक्यातील शिक्षकांनी सुरु केलेले नवनवे उद्योग तालुकावासीयांच्या चर्चेचा विषय बनले आहेत. लाँक डाऊन जाहीर झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेत सुरवातीला कामगिरी नसल्याने तालुक्यातील अनेक शिक्षकांनी आपल्या मुख्यालयात राहणे बंधनकारक असतानाही गाव गाठले. त्यानंतर तालुका आपत्कालीन समितीने अत्यावश्यक सेवांकरिता पन्नास शिक्षकांची मागणी केल्यापासून शिक्षकांच्या वतुर्ळात चांगलीच खळबळ उडाली.
घर बैठे केले असे उद्याेग
तर दुसरीकडे तालुक्याच्या ठिकाणी सुट्टीमुळे घरी बसलेले शिक्षक घरात स्वस्थ न बसता करीत असलेल्या उद्योगांमुळे प्रसिध्द होत आहेत. यामध्ये एका शिक्षकांने धुळे या आपल्या मुळगावातून कांद्याची दोन दिवसांपुर्वी गाडी मागवली. या गाडीतून शिक्षक व त्यांची पत्नी तालुक्यातील गावागावात फिरत होते .या संदर्भात स्थानीक नगरपंचायतीने शिक्षण विभागास कडक सुचना दिल्या आहेत. याचबरोबर तालुका गटशिक्षण अधिकारी यांनी जिल्हा शिक्षण अधिकाऱयांना पत्र देऊन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कडक उपाय योजना करण्याची मागणी
शिक्षकांने आवश्यकता नसताना कांदा विक्रीचा व्यवसाय सुरु केला . रेड झोनमधून आलेल्या परजिल्ह्यातील व्यक्तीमुळे तालुकावासीयांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान तालुक्यात शेतमालाच्या विक्रीकरिता रेड झोनमधून येणारी वाहने गावागावात जात असल्याने त्यातून रोगाचा संसर्ग होण्याची भिती वाढली आहे.बाहेरून येणारी वाहने तालुकावासीयांच्या चिंतेचा विषय बनली आहेत. प्रशासनाने या संदर्भात कडक उपाय योजना करण्याची मागणी होत आहे. शिक्षकांनी घरबसल्या केलेल्या उचापतीचे उद्योगांविषयी शहारातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
कायदेशीर कारवाई होणार
या संदर्भात नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी या घटनेस दुजोरा दिला आहे.आणखि दोन शिक्षकांची नावे पुढे येत असल्याने गटशिक्षण अधिकारी मंडणगड यांनी जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करुन योग्य ती कायदेशीर कारवाई करुन नगरपंचायतीस सुचीत करण्याच्या सुचना दिल्या असल्याची माहीती दिली. याचबरोबर संबंधित शिक्षकांस शिक्का मारुन होम काँरंटाईन करण्यात आल्याचे मुख्याधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.