'तेरेखोल'मधील पाणमांजरांचा अधिवास धोक्यात; कोकणातील जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर!

कोकणात आढळणारी पाण मांजराची 'स्मूथ कोटेट ओटर' ही जात संकटग्रस्तांच्या यादीत नोंद करण्यात आली आहे.
Otter Cats
Otter Catsesakal
Updated on
Summary

साधारण १५ ते २० वर्षांपूर्वी पाणमांजराची भारतभरात खूप मोठ्या प्रमाणावर शिकार झाली.

बांदा : तेरेखोल नदीपात्रातील (Terekhol River) अमर्याद वाळू उपसा, जिलेटिन स्फोट करून करण्यात येणारी बेकायदा मासेमारी व वाढता मानवी हस्तक्षेप यामुळे येथील जैवविविधता धोक्यात आली आहे. गोड्या पाण्यातील जैवविविधतेत व ग्रामीण भागातील पर्यटनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पाण मांजरांचा नैसर्गिक अधिवास यामुळे नष्ट होत असल्याने दिवसेंदिवस त्यांची घटणारी संख्या ही चिंतेची बाब आहे.

कोकणात आढळणारी पाण मांजराची 'स्मूथ कोटेट ओटर' ही जात संकटग्रस्तांच्या यादीत नोंद करण्यात आली आहे. येथील नैसर्गिक पर्यटन वाढीसाठी पाण मांजराचे संवर्धन होणे ही काळाची गरज आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा विपुल वनसंपदा व जैवविविधतेने संपन्न आहे. येथील गोड्या पाण्यात अनेक जातींच्या दुर्मिळ जैवाविविधता देखील सापडल्या आहेत.

जिल्ह्यातील बारमाही वाहणारे ओहोळ, पाणवठे तसेच नदीत मोठ्या प्रमाणात व सहजासहजी दृष्टीस पडणारी पाण मांजरे अलीकडच्या काळात संख्या कमी झाल्याने नजरेआड झाली आहेत. येथील तेरेखोल नदीपात्रात दिवसाढवळ्या देखील पाण मांजरे सहज दृष्टीस पडत होती. पाण मांजराचा अधिवास नष्ट होण्यासाठी अनेक कारणे आहेत. तेरखोल नदीत पाण मांजराचे अस्तित्व धोक्यात आले आहे. नदीपात्रात होणारे बेसुमार वाळू उपसा, जिलेटीन द्वारे केली जाणारी बेकायदा मासेमारी यामुळे पाण मांजराची राहण्याची ठिकाणे नष्ट झाली आहेत. तेरेखोल नदीचे भरतीचे पाणी हे बांद्यापर्यंत येते. नदीच्या उधाणामुळे अनेक ठिकाणी जमिनी खचल्या आहेत.

त्यामुळे नदी जवळची जंगले व देवराया नष्ट झाल्या आहेत. गेल्या २० वर्षात पाण मांजरे ही नदीत सहजासहजी दृष्टीस पडायची. लोकांनी नदी जवळील झाडांची मोठ्या प्रमाणात तोड केल्याने अधिवास नष्ट झाला आहे. नदीतील तसेच लगतची बेटे नष्ट झाल्याने अनेक पाण मांजरे दुर्मिळ झाली आहेत. जी काही शिल्लक पाण मांजरे होती त्यांना अन्नासाठी दूरवरचा प्रवास करावा लागला. यामुळे तेरेखोल नदीपात्रातील पाण मांजराची संख्या ही मोठ्या प्रमाणात घटली आहे. सद्यस्थितीत नदीपात्रात हाताच्या बोटावर मोजण्याइतपत पाण मांजरे शिल्लक आहेत.

कोकणात विशेषतः तिलारी, तेरेखोल व घटप्रभा नदीत 'स्मूथ कोटेट वोटर' ही प्रजाती आढळते तर स्मॉल क्लावेड ओटर ही प्रजाती गोड्या पाण्यात आणि जंगलातील ओढ्यामध्ये आढळते. दोन्ही प्रजातींचा समावेश हा अतिशय दुर्मीळ श्रेणीमध्ये करण्यात आलेला आहे. खाडी आणि नद्यामध्ये यांचे अस्तित्व आढळते.

कोकणात पाण मांजराला 'उद मांजर' असे नाव प्रचलित आहे. हा मांजर कुळातील समूहाने राहणारा प्राणी आहे. समूहाने शिकार करतात. कळपात माद्यांची संख्या ही अधिक असते. नदीतील मासे, खेकडे, बेडूक, कासव, नदीतील साप, सरडे व क्वचित प्रसंगी नदीजवळील पक्षी हे त्यांचे प्रमुख अन्न आहे. नदीमध्ये मोठ्या चपळाईने माशांचा पाठलाग करून त्यांची शिकार करणारे पाणमांजर कोणाच्याही हाती सहसा लागत नाही. हा समूहाने फिरणारा प्राणी असल्याने मगरदेखील शक्यतो त्यांच्या वाटेला जातं नाही. या सर्व कारणांमुळे पाणमांजर हे नदी परिसंस्थेत सर्वोच्च भक्षक बनतात. त्यांचे बीळ नदी किनाऱ्यावर असते. काही वेळा किनाऱ्यावरील दगडाच्या मोठ्या खाचा किंवा मोठ्या झाडांच्या पसरलेल्या मुळाच्या विस्तीर्ण छायेतही पाण मांजर राहतात.

Otter Cats
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील 'हा' एकेरी मार्ग सुरू; प्रवाशांसह विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

साधारण १५ ते २० वर्षांपूर्वी पाणमांजराची भारतभरात खूप मोठ्या प्रमाणावर शिकार झाली. या सुंदर आणि खेळकर प्राण्यांची कातडी मिळवून, त्याची तस्करी मोठ्या प्रमाणावर केली जायची. त्याचा इतर देशांमध्ये पर्स, टोपी इत्यादी वस्तू तयार करण्यासाठी उपयोग होत असे. आजही कमी-अधिक प्रमाणात ही तस्करी चालू आहे. सततच्या आणि मोठ्या प्रमाणावर चाललेल्या तस्करीने पाणमांजर दुर्मीळ प्राणी झाले आहे.

उत्तर भारतासह कोकणात त्यांची संख्या इतकी घटली आहे, की आता नदीच्या काही संरक्षित पट्ट्यांमध्येच त्यांचे अस्तित्व दिसते. भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत ‘स्मूथ कोटेट वोटर’ला अनुसूचित वर्ग-दोनमध्ये जागा दिली आहे, तर ‘स्मॉल क्लोड ऑटर’ला अनुसूचित वर्ग एक भाग एकमध्ये जागा दिली गेली आहे. अनुसूचित वर्ग एक ते चारमध्ये येणारे सर्व प्राणी वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षित आहेत.

चढत्या क्रमाने प्राणी किती दुर्मीळ, त्याचा अधिवास व आढळ किती संकुचित आहे, या आधारे त्याला पहिल्या वर्गात स्थान दिले जाते. 'स्मॉल क्लोड ऑटर'ला या कायद्यानुसार सर्वोच्च, म्हणजे पट्टेरी वाघाइतके संरक्षण मिळाले आहे. पाणमांजराच्या या दोन्ही प्रजाती सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळतात. या सर्व बाबी लक्षात घेऊन, लोकांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे.

Otter Cats
Health Tips : साथीच्या रोगाप्रमाणे वाढतोय हाडांचा ठिसुळपणा; दगडासारखी हाडं होताहेत काचांसारखी नाजूक

‘नदीचा राजा’ म्हणून ओळख

तेरेखोल नदीपात्रात मगरींची संख्या ही झपाट्याने वाढली आहे. गेल्या १० वर्षात तर मगरींची पैदास ही मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यांचे अन्न हे गोड्या पाण्यातील मासे असल्याने नदीत माशांची संख्या कमी झाली आहे. पाण मांजराचे अन्न देखील मासेच असल्याने याचा परिणाम अन्न साखळीवर झाला. साहजिकच याचा परिणाम पाण मांजराच्या अस्तित्वावर झाला. पाण मांजर अन्नाच्या शोधार्थ नदीपात्रात तब्बल २० ते ३० किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकतात. विशेष म्हणजे नदीचं पाणी जर शुध्द असेल तरच हा प्राणी त्या नदीत राहातो. त्याचबरोबर पाणमांजराच्या वावरामुळे नदीचं पाणी शुद्ध होत, कारण खराब झालेले किंवा मेलेले मासे ही पाणमांजरं खाऊन टाकतात. त्यामुळे या पाणमांजरांना 'नदीचा राजा' म्हणून देखील ओळखल जात.

पाणमांजरांचे महत्त्व

परिसंस्थेतील कमजोर घटकांना संपवून, त्याची गुणवत्ता राखण्यामध्ये भक्षक प्राण्याची महत्त्वाची भूमिका असते. हे कार्य नदी परिसंस्थेत पाणमांजर अमलात आणते. रोगट माशांची शिकार करून, या परिसंस्थेची गुणवत्ता टिकवून ठेवण्याचे काम ते करतात. याचा सरळ फायदा मासेमारी उद्योगाला होतो. नदी, तलाव व खाडी किनाऱ्यावरील अनेक कुटुंबे मासेमारीवर अवलंबून आहेत. नदीतील माशांना रोग आला तर मासेमारीवर अवलंबून असलेल्या ग्रामीण अर्थकारणावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडू शकतो. नदीत पाणमांजर नसल्यास हे प्रकार वारंवार घडण्याची शक्यता उद्भवते.

Otter Cats
आमदार साळवींच्या नेतृत्वात 143 लाखाचा पाणीटंचाई आराखडा तयार; 'या' गावांचा समावेश

विनाशाच्या टप्प्यावर उभा असलेला हा प्राणी आपल्या नदी, खाडी, समुद्राचे खरे वैभव आहे. नैसर्गिक अधिवासात कमालीचा मानवी हस्तक्षेप झाल्यामुळे मानव आणि वन्य जीवसंबंधातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. निसर्गातील परस्परावलंबन आणि परिणाम लक्षात घेता पाण मांजराचे संवर्धन व्हावे.

-प्रवीण सातोसकर, पाण मांजर अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.