Ratnagiri News : ओलिताखालील क्षेत्र ११ हजार ४९९ हेक्टरने वाढले;रत्नागिरी जिल्ह्यातील चित्र

जिल्ह्यात खाद्यपिकाचे क्षेत्र कमी झाले असले तरीही ओलिताखालचे क्षेत्र वाढले आहे. मागील दहा वर्षात खाद्यपिकांखालील क्षेत्र १ हजार ९०४ हेक्टरने कमी झाले; मात्र ओलिताचे क्षेत्र ११ हजार ४९९ हेक्टरने वाढले आहे.
Ratnagiri News
Ratnagiri Newssakal

रत्नागिरी : जिल्ह्यात खाद्यपिकाचे क्षेत्र कमी झाले असले तरीही ओलिताखालचे क्षेत्र वाढले आहे. मागील दहा वर्षात खाद्यपिकांखालील क्षेत्र १ हजार ९०४ हेक्टरने कमी झाले; मात्र ओलिताचे क्षेत्र ११ हजार ४९९ हेक्टरने वाढले आहे.

विहिरी, शेततळी, धरणाद्वारे, पाट, कालवा आदी सोयींमुळे ओलिताखालचे क्षेत्र वाढत आहे. ओलिताखालच्या क्षेत्रात अनेक पिके घेतली जाऊ शकतात. खाद्यपिकांमध्ये भात, नाचणी, वरी, कुळीथ, नागली, वाल, भाजीपाला अशी खाण्यायोग्य पिके घेतली जातात. पावसाळा संपल्यानंतरही ओलिताखालच्या क्षेत्रात वेगवेगळी पिके घेता येतात.

जिल्ह्यात २०१२-१३ मध्ये खाद्यपिकाखालचे क्षेत्र २ लाख ६९ हजार ४५८ हेक्टर इतके होते. कृषी अधिकाऱ्‍यांकडील नोंदीनुसार, २०२२-२३ मध्ये हे क्षेत्र १ हजार ९०४ हेक्टरने कमी होऊन २ लाख ६७ हजार ५५४ हेक्टर इतके झाले. खाद्यपिकाखालचे क्षेत्र कमी झाले असले तरीही ओलिताखालचे क्षेत्र ११ हजार ४९९ हेक्टरने वाढले आहे. दहा वर्षापूर्वी ओलिताखालचे जे क्षेत्र १४ हजार ७२ हेक्टर इतके होते ते आता २५ हजार ७७१ हेक्टर झाले आहे.

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील ओलिताखालचे क्षेत्र वाढले आहे. मंडणगड तालुक्यात दहा वर्षांपूर्वी ओलिताखालचे क्षेत्र १ हजार ९८ हेक्टर इतके होते ते आता १ हजार ६०२ हेक्टर इतके झाले आहे. दापोली तालुक्यात १ हजार ९९२ हेक्टरचे क्षेत्र २ हजार ६८४ हेक्टर झाले आहे. खेडमध्ये १ हजार ३७१ हेक्टरचे क्षेत्र २ हजार ८०७ इतके झाले आहे.

चिपळूणमध्ये १ हजार ९८१ हेक्टर क्षेत्र २ हजार ७६६ इतके झाले आहे. गुहागर तालुक्यात ओलिताखालचे क्षेत्र १ हजार ६५२ इतके होते ते आता १ हजार ९८९ इतके झाले आहे. रत्नागिरी तालुक्यात १ हजार ९७६ हेक्टर क्षेत्र वाढून ते आता ४ हजार २३१ हेक्टर इतके झाले आहे. संगमेश्वरातील १ हजार २८२ हेक्टरचे क्षेत्र आता ३ हजार ४९६ हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. लांजातील १ हजार २२४ हेक्टरचे क्षेत्र २ हजार ९३४ हेक्टरपर्यंत वाढले आहे. राजापूर तालुक्यात दहा वर्षांपूर्वी ओलिताखालचे क्षेत्र १ हजार ४९६ इतके होते ते आता ३ हजार ६० हेक्टरपर्यंत वाढले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com