Ganesh idols
Ganesh idols

फेटा, पितांबर वस्त्र परिधानी गणेशमूर्ती; महेश भानसेंची कलाकृती

Published on
Summary

यंदा कापडी पितांबर आणि फेटा परिधान केलेला बाप्पा हे खास आकर्षण असल्याचे मूर्तिकार महेश भानसे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

मंडणगड (रत्नागिरी): तालुक्यातील जावळे येथील मनोश्री आर्टस् गणेशचित्र शाळेत मूर्ती घडविण्याची लगबग सुरू असून संपूर्ण भानसे कुटुंब रंगरंगोटी करण्यात मग्न झाले आहेत. रंगकाम आणि डोळ्यातील जिवंतपणा हे मूर्तीतील वैशिष्ट्य असल्याने परिसरातील शेकडो घरातून या चित्रशाळेतील मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येते. यंदा कापडी पितांबर आणि फेटा परिधान केलेला बाप्पा हे खास आकर्षण असल्याचे मूर्तिकार महेश भानसे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

 Ganesh idols
कोकणातील गावं; पावसाळी पर्यटनास मंडणगड सज्ज

२००१ सालापासून चित्रशाळेत मूर्ती बनविण्यात येतात. लहानपासून कलेची आवड असलेल्या भानसे यांना या कामाची गोडी पाहून वडिलांनी प्रोत्साहित केले. (कै.) सोनू भानशे, (कै.) सुरेश चादावडे यांनी त्यांना आर्थिक मदतीचा हात दिला. भाऊ सुरेश, शशिकांत यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने कुटुंबातील मुले सोनल, नवनीता, जिनल, मनोश्री, बाजीगर, देवेंद्र, दिल, प्रेम, जिगर, मंस्वर यांनी चित्रशाळेला आपली शाळा बनवली आहे.

 Ganesh idols
मंडणगड तालुक्यातील ४५ हजार व्यक्तींचे सर्वेक्षण पुर्ण : १५ जणांना लागण

पत्नी महेश्वरी यांची कामात मदत होत असून गणपतीची सजावट, ज्वेलरी, डायमंड वर्क मनोश्री व मंस्वर करतात. भाविकांच्या आवडीप्रमाणे मूर्ती व रंगकाम, मातीकाम जसे हवे तस बनवून देण्यात येत असल्याने मूर्तीमध्ये वाढ झाली आहे. सध्या २५० मूर्ती त्यांच्या चित्रशाळेतून नेल्या जातात. रंग, मातीच्या किमंती वाढल्या आहेत. शाडू मातीच्या मूर्तींना जास्त मागणी आहे. केरळ येथील बांडल परिवार, कुडुकचे अबगुल, देव्हारे दक्षिणवाडी सार्वजनिक मंडळाची गणेशमूर्ती आकर्षक आहे.

 Ganesh idols
मंडणगड तालुक्यात 79 गावांनी रोखले कोरोनाला 

विविध रुपातील गणेश

भाविकांना ग्रामीण भागात उंदरावर आरूढ, सिंहासनावर विराजमान, जय मल्हार, कोळी गणपती, माशावर बसलेली, शंकराच्या मांडीवर बसलेली, फिलिप्स पद्मासन अशा रूपातील मूर्तींना मागणी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()