आंदोलन आता आणखी तीव्र करावे; राजू शेट्टी

चिपळुणात उपोषणर्त्यांशी चर्चा, सरकावर साधला निशाणा
आंदोलन आता आणखी तीव्र करावे; राजू शेट्टी
Updated on

चिपळूण : महापुराच्या आपत्तीनंतर पूरग्रस्तांना मदत करताना हात आखडता घेतला जातो; मात्र राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपुरात सरकारचा प्रचंड पैसा खर्च केला जातो. तिथे शासकीय निधीची कमतरता भासत नाही. चिपळूणच्या गाळ उपशासाठी मात्र लोकांना उपोषण करावे लागते, हे दुर्दैव आहे. पायातील हातात घेऊन जाब विचारायची वेळ आली आहे, राजकारण आणि द्वेष बाजूला ठेवून आंदोलन सुरू ठेवल्यास नक्कीच यश मिळेल, असे परखड मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उपोषणकर्त्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

वाशिष्ठी आणि शिवनदीतील गाळ काढावा, लाल व निळी पूररेषा रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी उपोषणकर्त्यांना भेट दिली. चिपळूण बचाव समितीचे अरूण भोजने, सतीश कदम, बापू काणे, शिरीष काटकर यांनी उपोषणामागील हेतू स्पष्ट केला. चिपळूणला महापुराचा कसा तडाखा बसला, शहर व परिसरात महापुराच्यावेळी कशी परिस्थिती होती त्याचे कथन केले. गेल्या ५० वर्षात शासनाने गाळ काढला नाही. आता गाळ काढल्याशिवाय पर्याय नाही. गाळ निघत नसल्याने लोकांना उपोषण करावे लागते आहे.

या वेळी राजू शेट्टी म्हणाले, अनेक आमदार अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि विकासकामांच्या टक्केवारीत गुंतले आहेत. त्यांच्याकडून कसल्या अपेक्षा ठेवणार? त्यामुळे आता संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही. प्रशासनाकडून कामांची अपेक्षा ठेवायची, म्हणजे माळरानावर शेती केल्यासारखेच आहे. तापमानवाढीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास झालाय. केव्हाही कधीही पाऊस पडतो. यापुढील कालावधीत असेच सुरू राहणार, त्याला पर्याय नाही. सरकारनेच याचे योग्य उत्तर शोधायला हवं.

याचे आपल्याकडे पुरावे

या राज्यकर्त्यांना भ्रष्टाचार करायला पैसा आहे. मोठमोठ्या शहरावरच ते खर्च करतात. राज्यातील इतर भागात गावे, शहरे आहेत की नाहीत? कोरोनाचे कारण देऊन मदत देण्याचे टाळले जाते; मात्र याच कोरोना कालावधीत शासनाने अव्वाच्यासव्वा दराने वस्तू खरेदी करून कोट्यवधीची माया मिळवली, याचे आपल्याकडे पुरावे आहेत, असाही आरोप त्यांनी यावेळी केला.

पायातले हातात घेऊन केलेली भाषा कळते

शांतपणे आंदोलन केले की त्याकडे लक्ष दिले जात नाही. त्यांना पायातले हातात घेऊन केलेली भाषा कळते. राजकारण आणि द्वेष बाजूला ठेवून आंदोलन सुरू ठेवल्यास नक्कीच यश मिळेल. उपोषणाचा लढा जोमाने लढण्यासाठी जनतेने परशुरामाचा अवतार घेऊन यात सहभागी व्हायला हवे, असेही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले

प. महाराष्ट्राच्या तुलनेत मोठे नुकसान

सांगली, कोल्हापूरसह चिपळूणलाही महापुराचा तडाखा बसला. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत चिपळूणकरांचे मोठे नुकसान झाले. न भरून येणारी हानी झाली, हे वास्तव आहे. २००५ मध्ये महापुरानंतर जशी शासनाकडून मदत झाली, तशी या वेळी झाली नाही. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आणि उपाययोजनेकडे केंद्र व राज्य सरकारचे साफ दुर्लक्ष झाले आहे, हे नाकारता येणार नाही, असेही श्री. शेटी यांनी नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()