Solapur Crime:शिवफाटा गांजा प्रकरणात दुसरी अटक, आरोपीने खेड सत्र न्यायालयात दाखल केला होता अटकपूर्व जामीन अर्ज

Solapur Crime:शिवफाटा गांजा प्रकरणात दुसरी अटक, आरोपीने खेड सत्र न्यायालयात दाखल केला होता अटकपूर्व जामीन अर्ज

तालुक्यातील शिवफाटा येथे जून महिन्यात जप्त केलेल्या गांजा प्रकरणी पसार असलेला दुसऱ्या संशयिताला येथील पोलिसांनी अटक केली.
Published on

Solapur Crime: तालुक्यातील शिवफाटा येथे जून महिन्यात जप्त केलेल्या गांजा प्रकरणी पसार असलेला दुसऱ्या संशयिताला येथील पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला ७ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. संतोष पुडंलिक काळे (४७, रा. शिवरत्न नगर, ता.पंढरपुर, जि.सोलापुर) अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले, की मुंबई गोवा महामार्गावर शिवफाटा येथील टोलनाक्याजवळ १२ जून रोजी रात्री अनिल चव्हाण याच्याकडून गांज्यासह इतर मुद्देमाल जप्त केला होता. यावेळी पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये संशयित अनिल चव्हाण याने विक्रीकरीता आणलेला गांजा हा संतोष पुंडलिक काळे याचेकडून विकत घेतला असल्याचे सांगितले होते. त्यामुळे या प्रकरणी येथील पोलिसांनी संतोष पुंडलिक काळे याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यासाठी पंढरपूर मध्ये पथक पाठवले होते.

मात्र तो याठिकाणी दोन्ही वेळा सापडून आला नाही. दरम्यान संतोष काळे याला आपल्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र सादर केले असल्याची माहिती मिळताच त्याने खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात खेड यांचे न्यायालयात अटकपूर्व जामीनाकरीता अर्ज दाखल केला होता.

मात्र, त्याचा अर्ज फेटाळण्यात आला होता. यानंतर संतोष काळे हा २६ ऑक्टोबर खेड न्यायालयात हजर झाला असता न्यायाधीशांनी त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड राजेंद्र मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन भोयर, पोलीस कॉन्स्टेबल अजय कडू व पोलीस कॉन्स्टेबल वैभव ओहोळ यांनी केली. (Latest Marathi News)

Solapur Crime:शिवफाटा गांजा प्रकरणात दुसरी अटक, आरोपीने खेड सत्र न्यायालयात दाखल केला होता अटकपूर्व जामीन अर्ज
Belgaum Black Day : बेळगाव, कारवार, निपाणीसह सीमाभागात आज काळा दिन; महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात प्रवेशबंदी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.