Crime: कर्जत मध्ये चोरट्यांचा सुळसुळाट; नागरिक त्रस्त

Theft
Theftesakal
Updated on

कर्जत तालुक्यात चोरट्यांनी सुळसुळाट वाढला असून शहरात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या तीन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास केल्याच्या घटना मंगळवारी (ता. १२) सकाळी घडल्या. त्यानंतर भरदुपारी डिकसळ येथील सोन्याच्या दुकानातदेखील चोरट्यांनी डल्ला मारला. दरम्यान, या प्रकरणांमुळे पोलिसांपुढे चोऱ्या रोखण्याचे आव्हान उभे राहिले असून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

Theft
Akola Crime News : गुन्हेगारी वाढली; रात्रीतून पोलिसांनी केली कारवाई

कर्जत शहरात मंगळवारी आमराई येथे काही महिला मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या. त्या वेळी नंबर नसलेल्या दुचाकीवरून दोघे जण आले. त्यातील एकाने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट तर दुसऱ्याने निळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला होता. दुचाकीवरील चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओढून नेली.

त्यानंतर कर्जत शहरातील रिलायन्स पेट्रोल पंप येथील दुसऱ्या महिलेचीही सोनसाखळी लंपास केली. त्यानंतर चोरट्यांनी कर्जत एसटी डेपो येथील महिलेला सावज करत तिच्या गळ्यातील सोनसाखळी ओढून नेली. या घटनांमुळे कर्जत शहरात खळबळ उडाली आहे. तिन्ही घटनांची कर्जत पोलिस ठाण्यात नोंद करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Theft
Karjat Crime:'त्या' सहा जणांवर गुन्हा दाखल ! ५ लाख रुपयांसाठी झालेल्या छळाला कंटाळून विवाहतेने उचललं होतं टोकाचं पाऊल

चारही घटनांतील चोर एकच?

कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील डिकसळ येथील रमेश ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानात मंगळवारी भरदुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी डल्ला मारला. डिकसळ व कर्जत येथील चोर एकच आहेत का? याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही. डिकसळ येथील चोरी करताना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. नेरळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Theft
Karjat-Khalapur Assembly Election : कर्जत, खालापुरात वाढला राजकीय गुंता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.