रत्नागिरी व राजापूर तालुक्यातील पाच ठिकाणी कासव संवर्धन केले जाते. नोव्हेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत कासवे अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येतात.
रत्नागिरी : जिल्ह्याच्या समुद्र किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले जातीची कासवे (Olive Ridley Turtles) अंडी घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात येतात. त्यांचे संवर्धनही केले जाते. यंदा जिल्ह्यात एकूण १६ किनाऱ्यांवर ८९६ घरट्यांचे संवर्धन करण्यात वन विभाग, कासव मित्र आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले. त्या घरट्यांमध्ये ८८ हजार ३१२ अंडी होती. त्यातील ४८ हजार १९२ कासवांना समुद्रात सोडण्यात आले. यंदा उन्हाचा कडाका अधिक असल्यामुळे काही अंशी त्याचा परिणाम झाल्याचे अभ्यासकांचे मत आहे.
यंदा जिल्ह्यातील आंजर्ले, केळशी, कर्दे, मुरूड, दाभोळ, कोळथरे, लाडघर, वेळास, गुहागर, गुहागर वरचा पाठ, तवसाळ, गावखडी, माडबन, व्येत्ये, मालगुंड, भाट्ये बीच या सोळा किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले जातीची कासवे अंडी घालण्यासाठी आली होती. त्याची नोंद वनविभागाकडे (Forest Department) झाली आहे. पूर्वी कासवे किनाऱ्यावर अंडी घालून गेल्यानंतर परिसरातील ग्रामस्थ अंडी शोधून ती खाण्यासाठी वापरत किंवा कोल्हे, कुत्रे ही अंडी फस्त करीत. परंतु वनविभागाकडून कासवसंवर्धन मोहीम राबवण्यास सुरुवात केल्यानंतर अनेक कासव मित्र पुढे आले. त्यामुळे कासव बचाव मोहिमेला वेग आला.
अगदी मच्छीमारांच्या जाळ्यात आलेली कासवेही पुन्हा समुद्रात सोडण्यात येऊ लागली आहेत. त्याचे फायदे दिसू लागले असून यावर्षी अंडी घालण्यासाठी येणाऱ्या कासवांची संख्या वाढली आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागात रत्नागिरी व राजापूर तालुक्यातील पाच ठिकाणी कासव संवर्धन केले जाते. नोव्हेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत कासवे अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येतात. त्यानंतर ४० ते ५० दिवसांच्या अंतराने या अंड्यातून पिले बाहेर पडतात. यंदा जिल्ह्यातील सोळा किनाऱ्यांवर ८९६ घरट्यांचे संवर्धन करण्यात आले. त्यामध्ये ८८ हजार ३१२ अंडी होती.
त्यातील आतापर्यंत ४८ हजार १९२ कासवांचे संवर्धन करण्यात आले आहे. अंड्यांच्या तुलनेत ५५ टक्के कासवांचे संवर्धन झाले आहे. सर्वाधिक गुहागर येथे २१ हजार ३६१ अंड्यांपैकी ११ हजार ५९८ अंड्यांचे संवर्धन झाले. तर गावखडीत १४ हजार ७२८ पैकी ८ हजार ९४६ अंड्यातून कासवं बाहेर पडली. दरम्यान, यंदा मार्चच्या आणि एप्रिलच्या सुरुवातीला उष्णतेचा फटका कासवाच्या अंड्यांना बसला. वाळूत हे संवर्धन होत असल्यामुळे वाळू तापल्याने मागील वर्षीपेक्षा यंदा वीस ते तीस टक्के अंडी अधिक खराब झाली.
समुद्र किनारी भागात यंदा कासवांचे मोठ्याप्रमाणात आगमन झाले होते. त्यामुळे घरट्यांची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर संवर्धनासाठी आवश्यक त्या उपाययोजना वनविभागाकडून करण्यात आल्या होत्या. त्यामुळे उन्हापासून अंड्यांचे संरक्षण करण्यात काही अंशी यशही आले. त्यामुळे कासव संवर्धन मोहिमेला सकारात्मक बळ मिळाले आहे.
-राजश्री किर, परिक्षेत्र वन अधिकारी
दापोली ८ २७१ २६८७९ १०५११
गुहागर ३ ३३८ ३४५०० २१६१०
रत्नागिरी ५ २८७ २६९३३ १६०७१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.