राजापूर : सरकारी योजना यशस्वीपणे राबवून त्यातून अपेक्षित परिणाम मिळणे हे वाळवंटातील ओअॅसिससारखे झाले असताना राजापूर तालुक्यात जलजीवन मिशन या योजनेतून मिळालेले परिणाम आकडेवारीसह प्रत्यक्षातही दिसून आले आहेत. ही योजना यशस्वीपणे राबवल्याने राजापूर तालुक्याचा संभाव्य टंचाई आराखडा आठ कोटी रुपयांनी कमी झाला आहे. गेल्या वर्षी १८ कोटी रुपये टंचाई आराखडा होता, तो या वर्षी १० कोटींपर्यंत मर्यादित राहिला आहे.
एप्रिल-मे महिन्यामध्ये भासणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईला सामोरे जाणारा तालुक्याचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यामध्ये ५३ गावांमधील १४३ वाड्यांचा समावेश असून सुमारे १० कोटींचा हा आराखडा तयार केल्याची माहिती पंचायत समिती प्रशासनाकडून देण्यात आली. या आराखड्यामध्ये नळपाणी योजना दुरुस्ती, बोअरवेल, विहिरीतील गाळ उपसा आणि दुरुस्ती, नवीन नळपाणी योजना आदी कामांचा समावेश आहे.
मुबलक प्रमाणात पाऊस पडूनही तालुक्याला दरवर्षी एप्रिल-मे महिन्यामध्ये पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. या संभाव्य पाणीटंचाईला सामोरे जाण्याच्या अनुषंगाने येथील पंचायत समितीतर्फे दरवषी संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार केला जातो. त्याप्रमाणे यावर्षीही तालुक्याचा संभाव्य
पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये पेंडखळे खालची निनावेवाडी, देवीहसोळ लिंगवाडी, कणेरी टोकळवाडी, सातेपेवाडी, वडवली सुतारवाडी, तेलीवाडी, कालचीवाडी, शिवाजीनगर चौरेवाडी, मांडवकरवाडी, बौद्धवाडी, तांबळवाडी, पाटीलवाडी, वरचीवाडी, शिवणेबुद्रुक, देवाचेगोठणे राऊतवाडी, शिवणेखुर्द, मोगरे सडेवाडी, नाटे बाजारपेठ, कोकरीवाडी, नजफनगर, गणेशनगर, कणेरकरवाडी, मंदरूळ पवारवाडी, झरेवाडी आदी गावांचा समावेश आहे.
यंदा या गावे, वाड्यांचा समावेश..
या वर्षीच्या आराखड्यात घरवंदवाडी, तिवंदामाळ, मौर्यवाडी, गणेशवाडी, भू साबळेवाडी, सरफरेवाडी, ब्राह्मणवठार, शहाणेघर, सरफरेवाडी, भिंगेवाडी, वाटूळ वाटूळतिठा, कोंडीवळे कासारवाडी, गोतावडेवाडी, वाल्ये बंदरवाडी, काजिर्डा धनगरवाडी, करक धनगरवाडी, आंबा मधलीवाडी, आंबा तांबलवाडी, धनगरवाडी जाभेदंड, ताम्हाणे धनगरवाडी, वाणीवाडी, हरमलेवाडी, कोंढेतडतर्फ राजापूर गाडगीळवाडी, धोपटेवाडी, ओशिवळे बागवेवाडी, परटवली गवसवाडी, वाणीवाडी, तेलीवाडी, मुसलमानवाडी, झर्ये कदमवाडी, सुतारवाडी, मिळंद सावडाव मानेवाडी आदी गावे आणि वाड्यांचा समावेश करावा लागला आहे.
वाड्यावाड्यांत मिळाले पाणी
घरोघरी पाणी देणारे जलजीवन मिशन योजना प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश शासनाने दिले असून त्याची जोरदारपणे अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे गेली काही वर्षे टंचाईग्रस्त असलेली अनेक गावे आणि वाड्यांचा जलजीवन मिशन योजनेमध्ये समावेश झाल्याने या वाड्या आणि घरे तसेच गावे संभाव्य टंचाई आराखड्यातून वगळली गेली आहेत.
गेल्या वर्षीचा आराखडाः १८ कोटींचा
तालुक्यातील गावांचा समावेशः ५३
अद्याप तहानलेल्या वाड्याः १४३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.