पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात रत्नागिरीच्या `या` तिघी 

Three Girl Form Ratnagiri Selected In Power Lifting Indian Team
Three Girl Form Ratnagiri Selected In Power Lifting Indian Team
Updated on

रत्नागिरी - इंडोनेशिया येथे 6 ते 8 मे या कालावधीत होणाऱ्या आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या संघात रत्नागिरीच्या धनत्री महाडीक, अनुजा सावंत, प्रतीक्षा साळवी यांची निवड झाली. 

धनत्री महाडीक हिने सब-ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक आणि फेडरेशन कप स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी तसेच अनुजा सावंत व प्रतिक्षा साळवी यांनी जुनियर राष्ट्रीय स्पर्धेत मिळविलेले सुवर्ण पदक आणि फेडरेशन कप स्पर्धेतील नेत्रदीपक कामगिरीच्या जोरावर या तिघींची भारतीय संघात निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीने रत्नागिरीची मान उंचावली आहे. गेल्या 4 वर्षापासून या तिघी पॉवरलिफ्टिंग हा खेळ खेळत आहेत. यामध्ये त्यांनी शालेय, विद्यापीठ सरयू तसेच ज्युनियर-सिनियर स्पर्धेत अनेक पदकांची कमाई केली आहे.

गेल्या वर्षातील यांच्या कामगिरीतील सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर भारतीय संघासाठी खेळण्याचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर देशासाठी पदक मिळवण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यासाठी गेली काही वर्षे यांचे प्रशिक्षक राज नेवरेकर हे त्यांची सातत्याने कसून सराव घेत आहेत तसेच त्यांचे मार्गदर्शक मदन भास्करे, सदानंद जोशी, निशिला महाडीक, सहकारी संदीप गुख, प्रथमेश पावसकर यांचेही यासाठी सहकार्य लाभत आहे. सराव अभुदय नगर नगर परिषद व्यायामशाळा येथे रोज सायंकाळी होत आहे. तसेच भारतीय संघाच्या सराव शिबिरासाठी जाऊन नंतर लगेचच इंडोनेशिया येथे आशियाई स्पर्धेसाठी रवाना होणार आहेत. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.