Raigad zilla parishad Building Dangerous Disclosure in Structural Audit in 2021
Raigad zilla parishad Building Dangerous Disclosure in Structural Audit in 2021sakal

Raigad News : रायगड जिल्‍हा परिषदेची इमारत अतिधोकादायक; २०२१ मध्ये स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये खुलासा

नवीन इमारत बांधण्यात येणार असून १०३ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला असून मंजुरीसाठी पाठवला
Published on

Raigad News : जिल्ह्याचा प्रशासकीय गाडा हाकणाऱ्या अलिबाग येथील रायगड जिल्हा परिषदेची इमारत अतिधोकादायक झाली असून पंधरा दिवसांत खाली करण्यात येत आहे. याठिकाणी नवीन इमारत बांधण्यात येणार असून १०३ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला असून मंजुरीसाठी पाठवला आहे.

मंजुरी येण्यापूर्वी इमारतीमधील सर्व कार्यालये कुंटेबाग, अलिबाग पंचायत समितीच्या कार्यालयांमध्ये स्थलांतरित केले जात आहेत. रायगड जिल्हा परिषदेची इमारत ३९ वर्षांपूर्वी बांधण्यात आली असून धोकादायक असल्याची बाब २०२१ मध्ये स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये समोर आली. समुद्रालगत असल्याने खारे पाण्याने इमारतीचे कॉलम कमकुवत झाले आहेत.

वादळी वाऱ्यात इमारत तग धरू शकत नसल्‍याचा अहवाल स्‍ट्रक्‍चरल ऑडिटमध्ये देण्यात आला होता. त्यामुळे लवकरात लवकर इमारत खाली करण्याच्या सूचना करण्यात आल्‍या होत्‍या. परंतु पर्यायी जागा मिळण्यात उशीर होत असल्याने टप्याटप्प्याने इमारत खाली करण्यात येत आहे. वर्षभरापूर्वी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील पाणी पुरवठा, स्वच्छता अभियानाचे कार्यालय रिकामी करून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूच्या कुंटेबागेत नेण्यात आले. पंधरा दिवसांत इमारत पूर्ण खाली करावी लागणार आहे.

Raigad zilla parishad Building Dangerous Disclosure in Structural Audit in 2021
New Parliament Building : नव्या संसद भवनाच्या दुसऱ्या टप्प्यात कशावर असणार फोकस, जाणून घ्या

शिवतीर्थ इमारत ३९ वर्षांची
रायगड जिल्हा परिषदेच्या इमारतीचे बांधकाम १९७८ मध्ये सुरू करण्यात आले होते. १९८२ मध्ये काम पूर्ण झाल्‍यावर इमारतीला ‘शिवतीर्थ’ नाव देण्यात आले. जिल्हा परिषदेचा कारभार एकाच इमारतीतून चालावा आणि सर्व विभाग एकाच इमारतीत कार्यरत असावेत, यासाठी तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी ही इमारत बांधून घेतली होती. यापूर्वी जिल्हा परिषदेचे बहुतांश कार्यालये पेण येथे होती. ती अलिबागमध्ये स्‍थलांतरित करण्यात आली.

लोणेरे विद्यापीठाकडून स्‍ट्रक्‍चरल ऑडिट
जिल्‍हा परिषदेच्या तीन मजली इमारतीच्या बाहेर शिवकालीन शिल्पे साकारण्यात आली होती. तेव्हापासून जवळपास ३९ वर्षे येथून जिल्हा परिषदेचा कारभार चालविला जात आहे. मात्र समुद्राची खारी हवा आणि कालपरत्वे इमारत जीर्ण झाल्‍याने स्ट्रक्चरल ऑडिटचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्‍त्र विद्यापीठातील स्ट्रक्चरल अभियंता डॉ. सचिन पोरे यांनी इमारतीची पाहणी केली. यानंतर इमारत धोकादायक असल्याचा अंतरिम अहवाल प्रशासनाला सादर केला आहे.

Raigad zilla parishad Building Dangerous Disclosure in Structural Audit in 2021
Dangerous School Building: जिल्ह्यात 441 शाळा धोकादायक इमारतीत! सर्वाधिक 85 शाळा सुरगाण्यातील

निवासी संकुलातून कारभार चालणार
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासाठी कुंटे बागेत व्यवस्था करण्यात येत आहे. पंधरा दिवसात काम पूर्ण करण्याचा बांधकाम विभागाचा संकल्‍प आहे. कुंटे बागेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या निवासाची व्यवस्था आहे, त्या बाजूलाच अधिकाऱ्यांच्या निवासी संकुले आहेत. तिथूनच आता जिल्हा परिषदेचा कारभार चालवला जाणार आहे.

सभागृहाची शोधाशोध
जिल्हा परिषदेमध्ये ना.ना. टिपणीस सभागृह, प्रभाकर पाटील सभागृह आहेत. इमारत पाडल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सभांसाठी एका मोठ्या सभागृहाची गरज भासणार आहे. पीएनपी नाट्यगृहाला आग लागल्यानंतर अलिबागमध्ये एकही मोठे सभागृह उरलेले नाही. त्यामुळे पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या सभा कुठे होणार, असा प्रश्न जिल्‍हा प्रशासनासमोर आहे.

Raigad zilla parishad Building Dangerous Disclosure in Structural Audit in 2021
Gram Panchayat Election : कांदळी ग्रामपंचायतची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर

कोणते कार्यालय कुठे असणार?
प्राथमिक शिक्षण - पंचायत समिती
माध्यमिक शिक्षण - पंचायत समिती
सर्व शिक्षा अभियान- पंचायत समिती
सामान्य प्रशासन- कुंटे बाग
समाज कल्याण - कुंटे बाग
महिला बाल कल्याण - कुंटे बाग

ग्रामपंचायत - कुंटे बाग
पशू संवर्धन/कृषी - कुंटे बाग
ग्रामिण विकास यंत्रणा- कुंटे बाग
सीईओ कार्यालय - कुंटे बाग (काम प्रगतिपथावर)
आरोग्य - जिल्‍हा रुग्णालय
ग्रामीण पाणी पुरवठा - शोध सुरू
अर्थ/बांधकाम - वाहनतळ
सभागृह - शोध सुरू

Raigad zilla parishad Building Dangerous Disclosure in Structural Audit in 2021
Gram Panchayat Election : कांदळी ग्रामपंचायतची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर

नव्या इमारतीच्या प्रस्तावास अद्याप मंजुरी मिळालेली नाही. सातत्याने पाठपुरावा सुरू असून लवकरात लवकर सर्व कार्यालयांना पर्यायी जागा मिळवून द्यावी लागेल. कार्यालये स्थलांतरित झाल्यानंतरही तिथे पायाभूत सुविधा सुस्थितीत कराव्या लागणार आहेत. सीईओंच्या कार्यालयाचे काम सुरू आहे. हे सर्व पंधरा दिवसात पूर्ण करून जिल्हा परिषदेची इमारत खाली केली जाईल.
- प्रसन्नजित राऊत, अभियंता, बांधकाम विभाग, राजिप

जिल्हा परिषदेच्या इमारतीतील कार्यालये स्थलांतरित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. वर्षभरापासून हे काम सुरू आहे. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये इमारत धोकादायक असल्याचा अहवाल आल्‍याने ती खाली करण्यात येत आहे. कार्यालये स्थलांतराचे काम वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत. ज्या कार्यालयांना जागा मिळणार नाही, त्यांच्यासाठी भाड्याच्या जागेचा शोध सुरू आहे. यासाठी जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- नीलेश घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.