गोधडी उद्योग
rat१०११.tx
(४ जानेवारी टुडे पान तीन)
( टुडे पान ३)
धरू कास उद्योजकतेची ..........लोगो
rat१०p८.jpg ः
74437
प्रसाद अरविंद जोग
उद्योग करायला फार भांडवल, मोठमोठी यंत्रसामुग्री लागतेच असं नाही तर अगदी घरातून आपल्याकडे असणाऱ्या जुजबी साहित्यातून, सुईदोऱ्यातून टाका घालत, ठिगळं लावत, पॅचवर्क करत करतसुद्धा एक मोठा उद्योग आपल्या कोकणातल्या गावकुसातून उभारला जाऊ शकतो. तो उद्योग म्हणजे गोधडी उद्योग. गोधडी, वाकळ ज्याला माहीत नाही असा मनुष्य कोकणात तरी शोधून सापडणार नाही. प्रत्येक घरात आजही जुनी एकतरी गोधडी सापडेल. गोधडी शिवणे ही एक प्रादेशिक पारंपरिक कला आज विशेषत्वाने घरपट जोपासली गेली तर या पारंपरिक ग्रामीण शिलाई कलेतून खूप मोठा रोजगार आपल्या इथल्या स्थानिक महिलांना मिळू शकतो. बचतगट, स्वयंसेवी संस्था, सोशल एंत्रप्रनर यांनी या विषयाकडे पुन्हा एकदा व्यावसायिक हेतूने प्रेरित होऊन लक्ष घालण्याची गरज आहे. दिसायला साधासा वाटणाऱ्या उद्योगात बरेच छोटे मोठे कांगोरे आहेत. ते उलगडण्याचा व एक नवीन दृष्टिकोन घेऊन हा व्यवसाय केल्यास होणाऱ्या आर्थिक लाभाचा आपण आजच्या लेखात आढावा घेण्याचा प्रयत्न करूया.
प्रसाद जोग,चिपळूण
--
गोधडी उद्योग
गोधडी म्हणजे काय? तर कपड्यांचे कोलाज काम असेही म्हणता येईल. छोटे, मोठे, वाकडे, तिकडे रंगीबेरंगी कपडे जुळवून त्यातून कलात्मकरित्या दुपटी शिवणे, हातशिलाई मशिनने किंवा सुईदोऱ्याने लांब टाक्यांच्या गोधड्या शिवणे ही एक कला आहे. रजई, दुलई, चादर, जाजम, रग, ब्लँकेट या उबदार वस्तूंप्रमाणे प्रत्येक घरात आवडीने वापरली जाते ती म्हणजे आईच्या, आजीच्या साड्या, जुन्या शाली, कॉटन पीस वापरून तयार केलेली गोधडी. ही गोधडी स्वत:ची अशी वेगळी ओळख असलेली वस्तू; पण त्यात माया, ऊब, नावीन्यता व सृजशीलता असते. गोधडीचे घरोघरी असलेले बॉण्डिंग समजून घेतले तर या गोधडी उद्योगातील असलेली मोठी ताकद दिसून येऊ शकते. करिता गोधडीच ब्रॅण्डिंग उद्योग होईल आऊटस्टँडिंग असेच म्हणाव लागेल. कारण, आज गोधडी उद्योगातील श्रीमंती बचतगटांपासून कॉर्पोरेट सेक्टरना चांगलीच कळून आली आहे. गोधडी उद्योग स्टार्टअपमध्येही ट्रेंडिंग आहे. इंग्लिशमध्ये गोधडीला क्विल्ट असं म्हटलं जातं.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतसुद्धा गोधडी व्यवसाय चांगलाच स्थिरावलेला दिसून येतो. या व्यवसायात येण्यासाठी टेलरिंग कौशल्य असेल तर उत्तमच; पण नसेल तर व्यावसायिक हेतूने आपले अंगचे कलागुण, कौशल्य वापरून बचतगट, ग्रामीण भागातील महिलांकडून हा उद्योग जॉबवर्क पद्धतीने सुरवातीच्या टप्प्यात सुरू करायला काहीच हरकत नाही. गोधडीमध्ये श्रममूल्य असल्यामुळे कस्टमायझेशननुसार वाढणाऱ्या तासांची, आपल्या सृजनशिलतेची, आपल्या विचारांची योग्य किंमत आपल्याला ठरवता यायला हवी. इंजिनिअरिंगमधली टाईम आणि मोशन स्टडी या छोटेखानी वाटणाऱ्या व्यवसायात पण महत्त्वाची ठरते. कारण, गोधडीचे मूल्यसुद्धा आपल्याला निर्धारित करण्यासाठी त्याला पूर्ण व्हायला लागणाऱ्या तासांचे प्रमाण कमी करणे गरजेचे ठरू शकते. हे सरावाने आणि पूर्वनियोजनाने शक्य होते. रॉमटेरियल निवड, त्यातील रंगसंगती, टाक्यांचे प्रकार, पॅचवर्क पद्धती, लेअर ऑर्डर म्हणजे अस्तरीकरण, जुन्या फॅब्रिकची योग्य निवड, चिंध्या, कापडाचे तुकडे किंवा थोडासा आऊटडेटेड झालेला लिलावात विकला जाणारा माल याकडे बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक तेथे कॉस्टकटिंगचा विचार करून पण गुणवत्तापूर्ण क्वीलटिंग स्किल्स आत्मसात करून गोधडी उद्योगात सुयोग्य व्यवस्थापन व विपणन कौशल्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची संधी गोधडी उद्योजकाला असते.
प्रयोगशीलता, स्पेस मॅनेजमेंट, डायमेंशन, ओरिएंटेशन, कन्स्ट्रक्टिव्ह अप्रोच, रीसायकलिंग, रीयुज ऑफ प्रोडक्ट या गोष्टी जर चांगल्याप्रकारे समजून घेतल्या तर गोधडी हा बिझनेस लोकल टू ग्लोबल होऊन क्विल्ट इंडस्ट्रीमध्ये रूपांतरित होऊन परकीय चलन मिळवून देणारा ठरू शकतो. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया घट्ट करायचा असेल, ग्रामीण पर्यटनाचा टक्का वाढवायचा असेल तर आपली संस्कृती, आपल्या परंपरा जोपासत आपल्याला ग्रामीण उद्यमीता वाढवावी लागेल. सहकारातूनसुद्धा हा उद्योग वाढीस लागू शकतो. साधी गोधडी, सिंगल गोधडी, पोर्ट्रेटमधील गोधडी, कॅलिग्राफिक नाव चितारलेली गोधडी, पोट भरलेली गोधडी, जोड गोधडी, जरीचे काठ असलेली गोधडी, पॅचवर्क गोधडी, इरकल गोधडी, कोलाज गोधडी, डिझायनर गोधडी असे गोधडीचे विविध प्रकार शिवून बाजारात आणता येऊ शकतात.
गोधडी म्हणजे मायेची ऊब देणारे आई-आजी यांच्या आठवणी चेतावणारे, आकर्षक रंगसंगतींमधील महावस्त्र असही आपण संबोधू शकतो. गोधडीबरोबरच गोधडी पॅटर्नप्रमाणे डोअर मॅट, बॅग्स, पिशव्या, चंच्या, तोरणे, कीचेन होल्डर, गिफ्ट आयटेम, फाईल कव्हर, रूखवाताच्या वस्तू बनवून विक्रीस ठेवता येऊ शकतात. हा उद्योग अमर्याद संधी असलेला व महिलावर्गाला सहज जमणारा असाच आहे. गोधडी लोकल मार्केटमध्ये साधारण चारशे ते बाराशेपर्यंत जाऊ शकते तर तेवढ्याच यु. एस. डॉलरना परदेशात विकली जाऊ शकते.
सांगलीच्या श्रुती दांडेकर, पुण्याच्या चंद्रिका किशोर या उच्चशिक्षित महिलांनी या उद्योगात स्वत:च्या कर्तृत्वाने मोठे बेंचमार्क सेट करून ठेवले आहेत. आपल्या रत्नागिरीतील ''गोधडी उद्योग'' नावाचा ब्रँड अल्पावधीतच लोकांच्या पसंतीला उतरला आहे. याचे सारे श्रेय शीतल शिरीष बामणे व कश्मिरा जयदीप बामणे यांच्या क्रीएटिव्ह थिंकिंगला जातं. सध्या त्यांच्याकडे दहा महिला घरून जॉबवर्कचं काम करून देतात. नाचणे, रत्नागिरी येथून घरून सोशलमीडियाच्या माध्यमातून आपल्या ब्रॅण्डचे प्रमोशन करतात. त्यांनी हा उद्योग लॉकडाउनच्या काळात घरातून मोठ्या हिमतीने सुरू केला होता. आज त्यांचा ब्रँड हळूहळू लोकप्रिय होऊ लागला आहे. पुजेसाठी बसायचे आसन, गोधड्या, दुपटी, कोस्टर, पायपुसणी, पॅचवर्क बॅग्स या त्यांच्या प्रोडक्टस्ना रत्नागिरीकरांनी पसंती दिलेली आहे.
ठळक व महत्वाचे....
* उद्यमी स्वतःचा गोधडी ब्रॅण्ड विकसित करू शकतात.
*गोधडी शिवणकला केंद्र गावात हूनरसे रोजगार तत्त्वावर उभारता येतील.
३. पर्यटन वाढण्यासाठी गोधडी महोत्सव भरवता येतील.
*गोधडीमध्ये आधुनिकता आणून नवीन फॅशन ट्रेंड आणता येतील.
* गोधडी व्यवसाय परकीय चलनसुद्धा मिळवून देणारा उद्योग ठरू शकतो.
* जुन्या फॅब्रिकचा वापर करताना हायजीन मेंटेन करण्याकडे भर द्यावा लागेल.
(लेखक उद्योग प्रेरणा प्रशिक्षक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.