खेड- कडधान्य शेतीतून उन्हाळ्यात 80 हजारांचे उत्पन्न

खेड- कडधान्य शेतीतून उन्हाळ्यात 80 हजारांचे उत्पन्न
Published on

( पान ५ साठी, अॅंकर)

फोटो ओळी
93110
उन्हाळ्यात बहरलेलं पावट्याचं शेत.
..................
93120
नानू कंचावडे
-------------

कडधान्य शेतीतून उन्हाळ्यात ८० हजारांचे उत्पन्न

नानू कंचावडे; ४४ गुंठ्यांत मूग, कडवा, पावटा, तूर, चवळी, उडीद, कुळीथ

खेड, ता.२ ः सुसेरी गावच्या तरुणाने ४४ गुंठे जमिनीवर फक्त कडधान्य पिकांची लागवड केली आहे. यामध्ये मूग, कडवा, पावटा, तूर, चवळी, उडीद, कुळीथ अशी पिके घेतली आहेत. या कडधान्य शेतीसाठी त्यांना सुमारे १२ हजार रुपयांचा खर्च आला असून, त्यातून त्यांना ८० हजारांचे उत्पन्न अपेक्षित आहे.
दरवर्षी पावसाळ्यात नारंगी नदीला पूर येतो. नदीचे पात्र विस्तारून लगतची भातशेती पाण्याखाली जाते. त्यामुळे लागवड केलेल्या भातशेतीतून फारसे काही हाती लागत नाही. त्यामुळे नारंगी नदीकाठच्या अनेक गावांतून गेली अनेक वर्षे उन्हाळी शेती केली जाते. त्यातीलच एक सुसेरी गाव असून, या ठिकाणी राहणारी मंडळी उन्हाळी शेतीतूनच आपला उदरनिर्वाह चालवितात.
कोकणातील बहुतांश गावांतील मंडळी नोकरी-धंद्यानिमित्त मुंबई-पुण्यात राहतात. सुसेरी गावातील बहुतांश मंडळी उन्हाळी शेतीत गुंतलेली दिसून येतात. पालेभाज्यांसह विविध फळे, भाज्या, कडधान्य शेतीतून सुसेरीतील ग्रामस्थ चांगले पैसे मिळवतात. पिकवलेली भाजी आणि कडधान्ये नजीकच्या खेड बाजारपेठेसह पंचक्रोशीत विक्री करतात. सुसेरी गावातील नानू कंचावडे हा युवक आपल्या कुटुंबासह उन्हाळी शेतीतून चांगले पैसे कमावतो. कंचावडे यांची घरची परिस्थिती गरिबीची, पण आई-वडील शेती करीत असल्यामुळे नानूलासुद्धा शेतीची आवड निर्माण झाली. त्यामुळे शेती आणि शेतीपूरक उद्योग तो करू लागला. सद्यःस्थितीत नानू आणि त्यांचे कुटुंबीय उन्हाळी शेतीत गुंतलेले दिसून येतात. यावर्षी कंचावडे यांनी आपल्या ४४ गुंठे जमिनीवर फक्त कडधान्य पिकांची लागवड केली आहे. यामध्ये मूग, कडवा, पावटा, तूर, चवळी, उडीद, कुळीथ अशी पिके त्यांनी घेतली आहेत. या कडधान्य शेतीसाठी त्यांना सुमारे १२ हजार रुपयांचा खर्च आला असून, यामधून त्यांना ८० हजारांचे उत्पन्न अपेक्षित आहे. कंचावडे यांनी सुसेरीपासून काही अंतरावर दीड एकर क्षेत्रात काजूची बागही फुलविली आहे. काजूच्या बागेतून त्यांनी उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे.
.................
चौकट
मोंगा लावणारा तरुण
नानू कंचावडे हा तरुण नारंगी नदीच्या किनाऱ्यावर मोंगा लावणारा तरुण म्हणून परिचित आहे. गेली काही वर्षे तो सुसेरीच्या नदीकिनाऱ्यावर चिकन, मटण, अंडी, पावट्याच्या शेंगा यांची लज्जतदार मेजवानीच देत असून त्याने या मोंग्याला व्यावसायिक रूप दिले असून, खेडवासीयांच्या त्याच्या मोंग्यावर उड्याच पडतात. खेडमधील अनेकजण थंडीच्या मोसमात नानू कंचावडे यांच्या शेतात मोंग्याची मेजवानी घेताना दिसून येतात. त्यामुळे ग्रामीण भागात राहूनदेखील आपला रोजगार तयार करणारा नानू अनेक बेरोजगार तरुणांपुढे आदर्श राहील यात शंका नाही.
---------------
कोट
गेली अनेक वर्षे आमचे कुटुंब शेतात राबते आहे. माझी आई शेतातील भाजी रोज सकाळी खेड बाजारपेठेत विक्रीसाठी घेऊन जाते. माझे बाबासुद्धा शेती करीत असून, ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात मेहनत घेतात. आमचे संपूर्ण कुटुंबच शेतात राबत असून शेती हाच आमच्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे.
-नानू कंचावडे, शेतकरी
............................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.