पोलिस भऱतीत परजिल्ह्याची छाप
पोलिस भरतीत परजिल्ह्याची छाप
निवड यादी जाहीर; रिक्त २२ चालक पदांसाठीची परीक्षा
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १४ ः सिंधुदुर्ग पोलिस दलातील रिक्त २२ चालकपदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची आणि प्रतीक्षा यादी आज निवड समिती अध्यक्ष तथा जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी जाहीर केली. यादीत परजिल्ह्यातील उमेदवारांचा भरणा जास्त आहे.
श्री. अग्रवाल, निरीक्षक तथा अल्पसंख्याक अधिकारी आर. जी. नदाफ, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रतिनिधी एम. एम. सावंत, समाज कल्याण आयुक्त सहायक लेखा अधिकारी भालचंद्र कापडी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण यांचे प्रतिनिधी दशरथ कदम यांची यादीवर स्वाक्षरी आहे. दरम्यान, जिल्ह्यात १२१ पोलिसपदांच्या भरतीसाठी विज्ञान, संगणक विज्ञान, कला, वाणिज्य पदवीधरसह पदव्युत्तर उमेदवारांचा भरणा आहे. यामुळे जिल्हा पोलिस दलाचा दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे, असे अग्रवाल म्हणाले. या भरतीसाठीची मैदानी चाचणी पूर्ण झाली असून आठ हजार ८४ पैकी पाच हजार ५९४ उमेदवारांनी हजेरी लावली.
चालकपदांसाठी २१२६ तर कॉन्स्टेबलपदांसाठी पाच हजार ९५८ अर्ज आले. चालकपदांसाठी १३०४ जणांनी हजेरी लावली तर ८२२ उमेदवार गैरहजर राहिले. चालक पदासाठी २०२७ पुरुष तर ९९ महिलांचे अर्ज आले. यातील १२४८ पुरुष उपस्थित राहिले. २२ जागांमध्ये खुला प्रवर्गतून एकूण ९ जागा होत्या. यात पाच पुरुष तर चार स्त्री उमेदवार निश्चित झाले. त्यात गुणपल नानासाहेब खोबारे (१४०), बाबू महिपती पाटील (१३८), संतोष रामचंद्र देवणे (१३८), संभाजी नानु कंदार (१३७), कुंदनसिंग संजय घुनवत (१३६), सोनिया अशोक नाईक (१२६), पूजा भागवत विधाते (१२६), धनश्री भिवा गुजळे (१२५), पराश्रम जिवाणू गावडे (माजी सैनिक, १२४) यांची समावेश आहे. त्याशिवाय दहा पुरुष आणि सहा महिला प्रतीक्षा यादीत आहेत. माजी सैनिकांसाठी तीन जागांची प्रतीक्षा यादी जाहीर केली आहे.
निवड झालेले असे
अनुसूचित जाती - आकाश संजय घाटगे (१२६), निशा हिंदुराव रानखांबे (१०७). प्रतीक्षा यादी पुरुष तीन व महिला तीन
अनुसूचित जमाती - योगेश हनुमंत महाले (१२९); तिघे प्रतीक्षा यादीवर.
विमुक्त जाती अ - नितीन सुदामसिंग दुमळे (१३५), पायल रामराव जाधव (१०८). प्रतीक्षा यादी पुरुष आणि महिला प्रत्येकी तीन.
भटक्या जमाती ब - बाजीराव यल्लप्पा नांदीवले (१२६). तिघे प्रतीक्षा यादीवर
भटक्या जमाती क - प्रशांत नाना पवणे (१३४). तिघे प्रतीक्षा यादीत
इतर मागास प्रवर्ग - प्रल्हाद सर्जेराव पाटील (१३५), किरण सुनील उगळे (१३४), सायली सखाराम दाभोलकर (११२). पाच पुरुष आणि तीन महिला प्रतीक्षा यादीत
विशेष मागास प्रवर्ग - विकास सुरेश भगत (१२८). तिघे प्रतीक्षा यादीत.
आर्थिक दुर्बल घटक - सागर बळवंत चौगुले (१३४), हर्षदा पृथ्वीराज पाटील (१२१). प्रतीक्षा यादीत प्रत्येकी तीन पुरुष आणि महिला.
तक्रारीसाठी उद्यापर्यंत मुदत
तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना आक्षेप असल्यास १६ एप्रिल सायंकाळी सहापर्यंत sp.sindhudurg@mahapolice.gov.in या ई-मेलवर तक्रार दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कागद पडताळणी बुधवारी
निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी बुधवारी (ता. १९) सकाळी १० वाजता पोलिस परेड मैदान येथे आहे. शैक्षणिक अहर्ता, जन्म तारीख प्रमाणपत्र, जात व आरक्षण प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, समांतर आरक्षण प्रमाणपत्र, वाहन चालक परवाना, संगणक अहर्ता प्रमाणपत्र, दोन पासपोर्ट साईज फोटो यासह संबंधित उमेदवारांनी उपस्थित राहावे. गैरहजर उमेदवाराला निवड यादीतून वगळण्यात येणार आहे, निवड समितीने कळविले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.