mango
mangoesakal

Mango Season : आंबा हंगाम अखेरच्या टप्प्याकडे; मात्र, पावसाची टांगती तलवार

एकीकडे आंब्याचे घटते उत्पादन आणि दुसरीकडे अवकाळी पावसाची टांगती तलवार यामुळे आंबा बागायतदारांची धांदल सुरु आहे. यंदाचा हंगाम आता अखेरच्या टप्प्याकडे जात आहे.
Published on
Summary

एकीकडे आंब्याचे घटते उत्पादन आणि दुसरीकडे अवकाळी पावसाची टांगती तलवार यामुळे आंबा बागायतदारांची धांदल सुरु आहे. यंदाचा हंगाम आता अखेरच्या टप्प्याकडे जात आहे.

देवगड - एकीकडे आंब्याचे घटते उत्पादन आणि दुसरीकडे अवकाळी पावसाची टांगती तलवार यामुळे आंबा बागायतदारांची धांदल सुरु आहे. यंदाचा हंगाम आता अखेरच्या टप्प्याकडे जात आहे. येत्या काही दिवसात हंगामाचे सूप वाजेल. दरम्यान, कॅनींग आंब्याचा दर अजूनही चढाच आहे.

यंदा तुलनेत आंबा उत्पादन कमी झाले. त्यामुळे काही बागायतदारांचा उत्पादन खर्च आणि उत्पन्न याची सांगड बसणे कठीण आहे. सुरुवातीचा जादा उत्पन्न मिळवून देणारा आंबा कमी होता. काही बागायतदारांकडे अखेरच्या टप्प्यातील आंबा शिल्लक आहे. मात्र, तो तयार होण्यासाठी अजुन चार दिवस जातील. तरीही अवकाळी पावसाचे सावट असल्याने बागायतदायांमध्ये धास्ती आहे.

यंदा अजूनतरी किनारी भागात अवकाळी पावसाने दणका दिलेला नाही. जिल्हाभरात देवगड वगळून इतर भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. मात्र, येथील बागायतदारांना पावसाने दिलासा दिला. मात्र, आता वातावरण बदलते आहे. उकाडा वाढला आहे. अधूनमधून ढगाळ वातावरण तयार होत असते. त्यातच दोन दिवसापूर्वी हलका पाऊस झाला. मात्र, यापुढे कधीही वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसण्याची बागायतदारांना भिती आहे.

त्यामुळे आधीच उत्पादन कमी असताना उर्वरित आंबा पावसापूर्वी काढण्यासाठी बागायतदारांची धांदल सुरु आहे. आंबा फळे तयार होतील तशी शोधून काढली जात आहेत. यासाठी बागायतदारांची धावपळ वाढली आहे. अजून सुमारे आठ दिवसच हंगाम चालेल, अशी शक्यता आहे. त्यानंतर उर्वरित आंबा कॅनींगकडे वळेल. बाजारातील आवक घटली आहे.

अनेकांना दूरुन दर्शन

यंदा सुरुवातीला निसर्गाने अवकृपा केल्याने आंबा उत्पादन घटले. अखेरच्या टप्प्यात आंबा हाती येईपर्यंत अवकाळी पावसाने अजून तरी दिलासा दिला आहे. त्यामुळे यंदा हापूसचे दर चढेच राहिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.