रत्नागिरी ः ''आजी-आजोबांचा गाव'' वृद्धाश्रम नवीन इमारतीत
- rat१४p१६.jpg ःKOP२३M०२८१४ रत्नागिरी ः लांजा-कोड्ये येथे अरूणाश्रम ''आजी-आजोबांचा गाव'' वृद्धाश्रमाच्या उदघाटनाच्यावेळी उपस्थित मान्यवर.
''आजी-आजोबांचा गाव'' वृद्धाश्रम नवीन इमारतीत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ ः भाकर सेवा संस्था ही रत्नागिरी जिल्ह्यातील एक सामाजिक कार्य करणारी संस्था असून, या वर्षी संस्थेने ३० व्या वर्षात पदार्पण केले आहे. संस्थेने आजवर विविध सामाजिक प्रकल्प राबवले आहेत. जसे शेतकरी प्रशिक्षण केंद्र, पाणलोट इंडो जर्मन, सखी वन स्टॉप सेंटर, जलजीवन मिशन, महिला समुपदेशन केंद्र, सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास. संस्थेने २०२१ मध्ये अरूणाश्रमाची स्थापना लांजा कोंड्ये येथे केली. या संस्थेच्या स्वतंत्र नवीन इमारतीचे उद्घाटन नुकतेच झाले.
जॉर्ज फिशर पायपिंग सिस्टीमचे एचआर मॅनेजर स्वप्नील कदम, सामाजिक कार्यकर्त्या सुषमा जोशी, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, भाकर सेवा संस्थेच्या अध्यक्ष मंगल पोवार, सचिव अश्विनी मोरे, संस्थापक देवेंद्र पाटील, संचालक पवनकुमार मोरे आणि विलास येरळेकर, खजिनदार प्रतीक्षा सोलीम तसेच भाकर सेवा संस्थेचे कार्यकर्ते उद्घाटनाला उपस्थित होते. या आश्रमाच्या माध्यमातून तीन प्रकल्प चालवले जातात. आजी-आजोबांचा गाव (वृद्धाश्रम), महिला पुनर्वसन केंद्र व व्यसनमुक्ती केंद्र या प्रकल्पाच्या माध्यमातून समाजातील निराधार, गरजू वृद्ध व्यक्ती व महिला यांना विनामूल्य निवारा, अन्न-पाणी, घरासारखे खेळीमेळीचे वातावरण, जीवनावश्यक वस्तू देण्यात येतात तसेच निराधार महिलांचे पुनर्वसन करून त्यांच्या आयुष्याला चांगले वळण दिले जाते. या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ग्रामीण रुग्णालय लांजाच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते. या वेळी विविध वाडीमधील लोकांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.