आधुनिक शेती

आधुनिक शेती

Published on

१३ (टुडे पान ३ साठी)

(१४ जून टुडे ४)

टेक्नो .............लोगो


-rat१९p६.jpg ः
२३M१०२२७
संतोष गोणबरे
---------

आधुनिक शेती

२१ वे शतक वेगवान विकास घेऊन आले आहे. शतकाच्या सुरवातीपासूनच खूप वेगवान घडामोडी होऊन विविध व्यवसायामधील तंत्रज्ञान बदलत गेले. एसटीडी ते घरगुती टेलिफोन ते डिजिटल टचस्क्रीन फोन, क्लिकचा कॅमेरा ते डिजिटल झूम कॅमेरा, पेट्रोल ते गॅस ते इलेक्ट्रिक बॅटरी इंधन वापरून चालणारी गाडी; अशी विविधांगी तंत्रज्ञानात प्रगती होत गेली. शेतीतसुद्धा वेगवेगळे प्रयोग झाले आहेत. त्यांचा स्वीकार करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला गेला तर शेतीचे उत्पादन कितीतरी पट अधिक वाढू शकते. भारत हा पारंपरिक शेतीला प्राधान्य देणारा देश असून, आधुनिक शेतीतील उपयुक्त तेवढे घ्यावे या तत्त्वाने नव्याचा अंगीकार ही काळाची गरज म्हणावी लागेल. ट्रॅक्टर, पेरणीयंत्र, रोटाव्हेटर, पंजी, बीबीएफ यंत्र, दोनफाळी नांगर आणि इतर यंत्राचा वापर ही आधुनिक शेतीची प्रमुख अंगे आहेत. कोकणात मळ्याची शेती होत असून, या शेतीचे क्षेत्र प्रामुख्याने डोंगरउतारावर असते. त्यामुळे या शेतीत यंत्रांचा फारसा उपयोग होत नाही, असा समज करून घेऊन इथला शेतकरी मनुष्यबळावर अधिक विसंबून राहतो. पर्यायी अधिक उत्पन्नाची शक्यता कमी होत जाते.

-संतोष गोणबरे, चिपळूण
----------

पारंपरिक शेतीपद्धतींमध्ये बैल, नांगर आणि इतर अवजारे वापरणे यांसारख्या पारंपरिक पद्धतींचा वापर करून पिकांची लागवड केली जाते. ही शेती श्रमप्रधान, वेळखाऊ, मनुष्यबळावर आधारित आणि कमी उत्पादनक्षम आहे. शेतकरी आपल्या पिकांच्या वाढीसाठी पाऊस आणि नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून असतात. शिवाय, पारंपरिक शेतीपद्धतींमुळे पर्यावरणाची हानी होऊ शकते, नैसर्गिक संसाधने कमी होऊ शकतात आणि जमिनीची धूप होऊ शकते. आधुनिक शेतीपद्धतींमुळे जमिनीचे आरोग्य सुधारून, पाण्याचा वापर कमी करून आणि प्रगत सिंचन तंत्राचा वापर करून पीक उत्पादन वाढवता येते. यामुळे जमिनीच्या प्रति युनिट उत्पादनाच्या प्रमाणात लक्षणीय सुधारणा होऊ शकते. खरेतर, या पद्धतीत तंत्रज्ञान आणि उपकरणांचा खर्च जास्त असल्याने तसेच यासाठी तांत्रिक ज्ञान आणि कौशल्य आवश्यक असल्याने शेतकऱ्यांच्यादृष्टीने काही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे सुरवातीला अभ्यास करून जर योग्य नियोजन केले तर नंतर सर्व सोपे होत जाईल. अचूक शेती हा यातील पहिला पर्याय असून यात मातीचे आरोग्य, हवामानाची पद्धत आणि पिकांची वाढ मोजण्यासाठी डाटा आणि सेन्सर वापरणे आणि नंतर या माहितीचा वापर करून लागवड, खत आणि सिंचनाबद्दल निर्णय घेणे इत्यादी घटक सामावलेले असतात. व्हर्टिकल फार्मिंग हा दुसरा पर्याय असून, ज्यामध्ये उभ्या थरांमध्ये पिके वाढवणे अपेक्षित आहे. या तंत्रात उभ्या शेतीमुळे कमी जागेत मोठ्या प्रमाणात पीक तयार होऊ शकते आणि पाण्याचा वापरदेखील कमी होतो. हायड्रोपोनिक्स शेती हे देखील एक नवे तंत्र असून, यात मातीऐवजी पाण्यात पिकाची वाढ केली जाते जेणेकरून मातीची कमी गुणवत्ता किंवा मर्यादित जमिनीची उपलब्धता असलेल्या ठिकाणी हे तंत्र आदर्शवत आहे. एरोपोनिक्स हे एक वेगळेच तंत्र असून, यामध्ये धुक्याच्या वातावरणात पिकाची लागवड केली जाते. या तंत्राने पालेभाज्या, औषधी वनस्पती आणि लहान भाज्या पिकवता येतात.
शाश्वत शेती होणे गरजेचे आहे, हे शेतीतील अद्ययावत तंत्र असून यात जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी पीक फेरपालट, आवरण पीक आणि नैसर्गिक कीड व्यवस्थापन यासारख्या पद्धतींचा वापर केला जातो. शाश्वत शेतीमुळे जैवविविधता सुधारू शकते आणि कार्बन उत्सर्जन कमी होऊ शकते. काही शेतकरी मित्र सेंद्रिय शेतीचा पर्याय निवडतात. बदलत्या आरोग्य सवयींमध्ये सेंद्रिय शेती नवसंजीवनी देण्याचे काम करत आहे. यामध्ये कृत्रिम खते किंवा कीटकनाशकांचा वापर न करता पिकांची लागवड केली जाते. सेंद्रिय शेतीमुळे आरोग्यदायी पिके घेता येतात आणि ती पर्यावरणासाठी चांगली असतात. या पद्धतीच्या शेतातून निघणारी पिके जास्त किमतीला विकली जात असल्याने आर्थिक फायदा चांगला होतो. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा कल या शेतीकडे वाढत आहे. रोबोटिक्स आणि ऑटोमेशन ही आधुनिक शेतीतंत्रे आहेत ज्यात लागवड, कापणी आणि तण काढणे यासारखी कामे करण्यासाठी यंत्रांचा वापर करणे समाविष्ट आहे. खरेतर प्रत्येक शेतकऱ्याजवळ स्वत:ची जनावरे, गांडूळ खत युनिट, शेणखत युनिट, गोमूत्र साठवण टाकी, जीवामृत टाकी असावी. त्यातून खतांचा खर्च आणि जमिनीचा कस दोन्हीही आवाक्यात राहतात. शेताच्या प्रत्येक कोपऱ्यात मधमाश्यांच्या पेट्या लावल्यास उत्पन्न नक्कीच दुप्पट वाढेल, याबद्दल अजिबात शंका नको. कोकणात व्यावसायिक शेतीच केली जात नाही. व्यावसायिक शेतीसाठी मानसिकता आवश्यक आहे. इच्छाशक्ती, दृढ विश्वास आणि सातत्य यातून जमिनीत सोनेदेखील रूजून येऊ शकते.
अत्याधुनिक तंत्राने शेती अधिक शाश्वत आणि व्यावसायिक करणे शक्य आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे हंगामी आणि बिगरहंगामी पिके घेता येऊ शकतात. कित्येक शेतकरी आज सौरऊर्जेची शेती करताना दिसत आहे. आपल्या शेतावर थोडी थोडी फट ठेवून जर सौरपॅनेल बसवली तर शेतीला आवश्यक तो सूर्यप्रकाशही मिळेल आणि सौरऊर्जा निर्माण होऊन शेतीच्या अवजारांसाठी इंधनाचीदेखील सोय होईल. पॉलिहाऊस ही संकल्पना आता जुनी झाली असून, सौर हाऊस ही संकल्पना जर आपण आपल्या शेतात राबवली तर भविष्यात शेती कधीच तोट्यात जाणार नाही. आपल्याला सोने पिकवायचे असेल तर मोती पेरावे लागतील; त्यासाठी नफ्याचा विचार संकुचित नव्हे, घवघवीत आर्थिक लाभाचा करायला हवा.

(लेखक महाविद्यालयाचे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आहेत.)

-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.