नरेंद्राचार्य महाराजांच्या साक्षीने गुरूपौर्णिमा साजरी

नरेंद्राचार्य महाराजांच्या साक्षीने गुरूपौर्णिमा साजरी

Published on

rat3p24.jpg
M13641
रत्नागिरीः नाणीजक्षेत्री सोमवारी सुंदरगडावर गुरुपूजन करताना भाविक.
-----------
नरेंद्राचार्य महाराजांच्या उपस्थितीत गुरूपौर्णिमा साजरी
लाखो भाविक उपस्थित; पाच रुग्णवाहिकांसह व्हॅनिटी व्हॅनचे लोकार्पण
रत्नागिरी, ता. ४ः गुरूपौर्णिमेनिमित्त नाणीज येथे निसर्गरम्य सुंदरगडाच्या साक्षीने लाखो भाविकांनी भर पावसात गुरुपूजन केले. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांनी भाविकांना शुभाशीर्वाद देऊन आयुष्य आनंदी ठेवण्याबाबत उपदेश केला. यावेळी पाच रुग्णवाहिकांसह एका व्हॅनिटी व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले.
जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान आगमन झाले. त्यांच्यासमवेत सुप्रियाताई, कानिफनाथ महाराज, ओमेश्वरीताई, देवयोगी असे सारे कुटुंबीय होते. प्रथम त्यांनी मंदिरात जाऊन गुरूंचे दर्शन घेतले. संतपीठावर भाविकांना प्रातिनिधिक पूजेची संधी दिले जाते. हा मान मीनाक्षी व मदन मारुती महाडिक यांना मिळाला.
राज्यातील विविध महामार्गावर होणाऱ्या अपघातामधील जखमींवर तातडीने उपचार सुरू व्हावेत यासाठी आणखी पाच रुग्णवाहिकांचे लोकार्पण जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या हस्ते झाले. एका व्हॅनिटी व्हॅनचेही लोकार्पण करण्यात आले. दिव्यांगासाठी कार्य करणाऱ्या पॉझिटिव्ह सोल फौंडेशनला ही व्हॅन संस्थांतर्फे भेट देण्यात आली आहे.
या सोहळ्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी विनीत चौधरी, मुंबईचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल वळवी, मोटार वाहन निरीक्षक अविनाश मोराडे, तहसीलदार राजाराम म्हात्रे, राष्ट्रवादीचे अविनाश लाड आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.